काम वाकडं करुन परत सरळ करतात त्याची मांणसं नोंद ठ——वतात!
- Navnath Yewale
- Aug 2
- 1 min read
नव्या कृषीमंत्र्यांचे वादग्रस्त विधान; महसूल दिनाच्या कार्यक्रामत मंत्री भरणेंच वक्तव्य

राज्याचे नवनियुक्त कृषीमंत्री दत्तात्रय ीरणे यांनी महसूल दिनानिमित्त इंदारपूर येथे केलेल्या भाषणात एक अजब सल्ला दिल्याने उपस्थितांच्या भुवया उंचवाल्या आहेत. महसूल अधिकार्यांना मार्गदर्शन करताना मंत्री भरणे म्हणाले की, ‘सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात त्याची माणसं नोंद ठवेतात, ‘ या विधानामुळे कार्यक्रमाला उपस्थितीत अधिकार्यांमध्ये क्षणभर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
इंदापूरमध्ये आयोजित महसूल दिनाच्या कार्यक्रामास मार्गदर्शन करताना कृषीमंत्र्यांच्या या वक्तव्याने चांगलीच खळबळ उडाली. महसूल विभागाकडून पारदर्शक आणि प्रामाणिक सेवा अपेक्षित असताना, मंत्र्यांनी ‘ काम वाकडं करून परत सरळ करण्याचा ’ सल्ला दिल्याने अश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दत्तात्र्य भरणे यांनी पुढे शेतकर्यांच्या तक्रारींना वेळीच न्याय मिळावा आणि योजनांचा लाभ योग्य हक्कदारांपर्यंत पोहोचावा, असेही नमूद केले. मात्र त्यांना नव्या मंत्रिपदाची धुरा मिळताच अशा अजब विधानामुळे मंत्री महोदय अडचणी येण्याची शक्यता आहे.
स्थानिक पातळीवर या वक्तव्यामुळे वादाला फोडणी मिळण्याची शक्यता आहे. तसेच राज्य पातळीवर देखील पडसाद उमटू शकतात माणिकराव कोकाटेंनंतर आता दत्तात्रय भरणेंनी वादाग्रस्त विधान केल्याने कोणती नवी घडामोड घडणार पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांत राजकीय पटलावर अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. वादग्रस्त विधान आणि प्रकरणांमुळे महायुतीतील अनेक नेते वादाच्या भोवर्यात सापडले आहेत. यामुळे काहींना डच्चू मिळणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. याची सुरूवात माणिकराव कोकाटेंपासून झाल्याचे चित्र आहे. पण कोकाटेंचे मंत्रिपद काढण्यात आले नसून त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यामुळे बाकीच्या वादग्रस्त मंत्र्यांचीही धाकधूक वाढणार आहे. यातच आता भरणेंच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात काय घडतं, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



Comments