top of page

कृषीमंत्री कोकाटेंची ज्येष्ठ आमदाराकडून पाठराखण

कोकाटे स्पष्टवक्ता माणूस, चुकीचं बोलत असेल, तरी मनात काही नसतं


ree

राज्यातील शेतकर्‍यांविषयी सातत्याने वादग्रस्त वक्तव्य, पावसाळी अधिवेशन सुरू असताना सीागृहात ऑनलाइन रम्मी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने अडचणीत आलेल्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची लवकरच गच्छंती होण्याची शक्यता आहे. त्यातच आता माणिकराव कोकाटी हा स्पष्ट वक्ता माणूस आहे. बोलताना आपली मंत खुलपणाने मांडतात.जरी चुकीच्या पद्धतीने बोलत असतील तरी ती त्यांची भाषा आहे. त्यांच्या मनात काही नसतं, असं म्हणत बीडच्या माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटी यांनी पाठराखण केली आहे.

बीड जिल्ह्यासाठी केवळ ओबीसींनाच मंत्रीपदं दिली जात असल्याची खदखद आमदार प्रकाश सोळंके यांनी बोलुन दाखवली. मी सहाव्या टर्म चा आमदार असतना मला मंत्रीपदापासून डावलनं म्हणजे कुठंतरी माझी जात मला आडवी येत असल्याच्या नरवस भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. उच्च न्यायालयाने धनंजय मुंडे यांना कथित कृषीविभागातील टेंडर प्रक्रियेच्या गैरव्यवहार प्रकरणात क्लिन चिट दिली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे याच्यावरील चौकशीत अश्याच प्रकारे क्लिन चिट मिळाली तर त्यांना परत संधी देण्याचे भाष्य केले होते. यावरून आमदार प्रकाश सोळंके यांनी माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात घेतलं तर शुभेच्छा, त्यांना बीडचा पालकमंत्रीपद द्यावं, आणखी मोठी संधी मिळावी असंही आमदार प्रकाश सोळंके म्हणाले.


राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा पावसाळी अधिवेशनाच्या सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता मंत्रिपदावरून त्यांची गच्छंती होण्याची चर्चा आहे. याबाबत मंगळवार पर्यंत निर्णय घेण्यात येईल असे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यावर आमदार प्रकाश सोळंके म्हणाले की, कोकाटे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत. मी त्यांना जवळून ओळखतो. मागच्या 30-35 वर्षापासून आमचा संबंध आहे.


अतिशय स्पष्ट वक्ता माणूस आहे. बोलताना त्यांची जी काही मतं आहेत ती खुलेपणाने मांडणारा माणूस आहे. त्यामुळे जरी काही चुकीच्या पद्धतीने ते बोलत असतील तरी त्यांची भाषा आहे. मागच्या पाच सहा महिन्यांमध्ये कृषी खात्यामध्ये जो काही गोंधळ मागच्या काळात झाला, फक्त पिक विमा च्या बाबतीत असेल किंवा बदल्यांच्या बाबतीत असेल आज कृषी खात्यातील वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकारी यांना विचारलं तर कृषी खात्यात कोणताही गैरव्यवहार न करणार्‍या मंत्र्यांमध्ये ते कृषी मंत्री कोकाटे यांचे नाव घेतात. बदल्यांची पद्धत.


अतिशय पारदर्शक पद्धतीने करणारा आणि कृषी खात्यात शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे शेतकर्‍यांविषयी कणव असणारा माणूस आहे. माध्यम राईचा पर्वत करत आहेत. सभागृहात पाच-पाच सहा -सहा तास मंत्र्यांना बसावं लागतं. त्या काळात आम्ही सुद्धा फोन उचलतो. आपापसात चर्चा करतो. कधी व्हाट्सअप बघतो. हेच नेमकं चित्रण झालं तर प्रत्येककाची अडचण होणार. असंही आमदार सोळंके म्हणाले.

Comments


bottom of page