कोणाचे तुकडे उचलू नका, गुंड पाळू नका, वाईट काम करू नका - मंत्री पंकजा मुंडे
- Navnath Yewale
- Oct 2
- 1 min read

मंत्री पंकजा मुंडे यांचा सावरगावमधील भगवान भक्तिगडावर दसरा मेळावा संपन्न झाला पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यास संबोधीत केले. या मेळाव्यास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
आमदार धनंजय मुंडे, लक्ष्मण हाके यांच्यासह भगवान भक्त, मुंडे अनुयायांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
लक्ष्मण हाके, आमदार धनंजय मुंडे यांनी मनोगत व्यक्त केले. आमदार धनंजय मुंडे यांनी शेरो शायरीत आपण गप्प का होतो, याचा एकप्रकारचा खुलासा करण्याचा प्रयत्न केला.मी ज्या ज्या जातीच्या आरक्षणाचा प्रश्न आला त्या त्या जातीच्या आंदोलनात सहभागी झालो. मराठा समाजास आरक्षण दिलं आमची काही हारकत नाही पण आमच्या ताटातून नको. यावेळी आमदार मुंडे यांनी एमपीएससी मध्ये ओबीसी आणि इडब्ल्यूएस मधील कटॉपचा फरक सांगत मराठा आरक्षणाचा परिणाम सांगण्याचा प्रयत्न केला.
मंत्री पंकजा मुंडे यांच्या भाषणाला सुरुवात होताच घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मंत्री मुंडे यांनी उपस्थितांवर संतापून भगवान बाबाची शपथ घातली. यावेळी नका कोणाचे तुकडे उचलू, नका वाईट काम करू, नका गुंड संभाळू असे म्हणत त्यांनी उपस्थितांना स्वभिमानाने जगण्याचा सल्ला दिला. उपस्थितांमधून वारंवार घोषणाबाजी होत असल्याने मंत्री पंकजा मुंडे यांनी अधून मधून गर्दीला शांत राहण्याचे आवाहन केले.
वाल्मिक कराडचे बॅनर झळकले: मेळाव्या आधीच जमलेल्या लोकांमध्ये वाल्मिक कराडचे बॅनर झळकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात वाल्मिक कराउ हा मुख्य आरोपी आहे. बीडच्या तुरुंगात तो जेरबंद आहे. मात्र, पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यासाठी आलेल्या काही जणांनी हाता वाल्मिक कराड याचे पोस्टर झळकवले. पोस्टरवर आम्ही वाल्मिक अण्णाला पाठींबा देतो, असा मजकूर होता. दरम्यान, कराडचे समर्थन करणारे पंकजा मुंडे यांचे कार्यर्ते आहे की नाही, याची माहिती मिळू शकली नाही. मात्र मेळाव्यासाठी आलेल्या तरुणांनी असे पोस्टर झळकवत हत्येच्या गुन्ह्यात तुरुगांत असलेल्या आरेापीचे समर्थन केल्याने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला.



Comments