top of page

कोरोनाचं संकट; पुण्यात एकाच दिवसात सर्वाधिक 33 रुग्णांची नोंद



कोरोनाने देशात पुन्हा पाय पसरले आहेत. देशभरात कोरोना व्हायरस बाबात चिंतेचे वातावरण असतानाच आता राज्यातही कोरोना विषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे. काला एका दिवसात पुण्यात सर्वाधिक 33 कोरोना रुग्णांची नोंद झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील सर्व दहा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांध्ये कोरोनाव्हायरस आढळला आहे. सीएसआयआर-नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (एनसीएी) द्वारे सांडपाणी निरीक्षणातून असे नमुने उघड झाले आहेत.

एनसीएल ही पुण्यातील एकमेव संस्था आहे जी शरहातील सर्व दहा एसटीपीचे पद्धतशीर सांडपाणी निरिक्षण करते. प्रयोगशाळेेने ओमिक्रॉन आणि त्याच्या उप-प्रकारामुळे झालेल्या मागील लाटांचा यशस्वीपणे मागोवा घेतला आहे. दहा सांडपाणी प्रक्रिया केंद्रामधील नमुन्यांच्या आठवड्याच्या चाचणीत 60 नमुन्यांपैकी अंदाजे 40 नमुन्याचे पॉझिटिव्ह निकाल दिसून आले. पहिला पॉझिटिव्ह नमुना 22 एप्रिल रोजी एकाच एसटभपीमधून आढळून आला, तर 6 मे पासून सर्व प्रक्रिया केंद्रामध्ये पॉझिटिव्ह निकाल दिसून आले.


एपसीएलचे शास्त्रज्ञ आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ.महेश एस. धारणे यांनी टीओआयला सांगितलं की, सध्याची वाढ हळूहळू हो असल्याचं दिसून येत असलं तरी सांडपाण्याच्या नमुन्यांमधील पॉझिटिव्हची पातळी मागील वाढीच्या नमुन्यांप्रमाणेच आहे. ज्यामुळे कोविड ट्रान्समिशन ट्रेंडबद्दल महत्वाची माहिती मिळते.


कोविड-19 च्या कम्युनिटी प्रसाराचा मागोवा घेण्यासाठी सांडपाणी निरीक्षण ही एक महत्वाची पूर्वसूचना प्रणाली आहे, जी अनेकदा क्लिनिकल प्रकरणं नोंदवण्यापूर्वी काही दिवस किंवा आठवडे आध विषाणूची उपस्थिती शोधते. यामुळे सार्वजनिक आरोग्य अधिकार्‍यांना संपूर्ण समुदायांमधील संसर्गाच्या ट्रेंडबद्दल रिअल- टाइम माहिती मिळते. ज्यामुळे ते लक्षणं नसलेल्या प्रकरणांचा आणि उद्योन्मुख प्रकरणांचा मागोवा घेण्यासाठी विशेषत: महत्वाची ठरते. वैयक्तिक वर्तन आणि आरोग्यसेवेच्या उपलब्धतेवर अवलंबून असलेल्या क्लिनिकल चाचणीच्या उलट सांडपाणी निरिक्षण विशिष्ट सांडपाणी प्रणालींद्वारे सेवा दिलेल्या संपूर्ण लोकसंख्यच्या सामूहिक विषाणू भार दाखवतो.


राज्यात कोरोणाची स्थिती :

राज्यात एकाच दिवसात 100 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. गुरूवार 5 जूनच्या राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार 105 रुग्ण आढळले. त्यापैकी 33पुणे महापालिका क्षेत्रात तर 32 मुंबईत आहेत.

जानेवारी 2021 पासून आतापर्यंत 13707 चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी 1064 पॉझिटिव्ह आहेत. 521 रुग्ण बरे झाले आहेत. एकून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 526 आहे. तर 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


 
 
 

Commentaires


bottom of page