top of page

गॅस तुटवडा : चिंताग्रस्त हॉटेल व्यवसायिकांची सरकारकडे धाव मंत्री भुजबळांचा केरोसिन वापरण्याचा सल्ला पण...

मुंबई : आखाती देशातील युद्धांमुळे निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम आता शहरातील हॉटेल उद्योगावरही दिसू लागला आहे. व्यवसायिक गॅसचा पुरवठा बंद असल्याने शहरातील हॉटेल व्यवसायिकांची चिता वाढली आहे. सध्या काही हॉटेल्सकडे असलेल्या शिल्लक गॅस साठ्यावर व्यवसाय सुरू असला, तरी परिस्थिती कायम राहिल्यास येत्या दोन दिवसांत सुमारे 20 टक्के हॉटेल बंद पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री भुजबळ म्हणाले की, गॅसचा तुटवडा आहे हे मान्य आहे, मात्र जगात हाहाकार सुरू आहे. पाकिस्तानात आज काय चाललंय तुम्हालाही माहिती आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारला आणि गॅस उत्पादक कंपन्यांना पत्र पाठवलेलं आहे. त्यात त्यांनी एलपीजी गॅस निर्माण करण्याचे आदेश दिलेले आहेत, अशी माहिती मंत्री भुजबळ यांनी दिली.


धरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा ही प्राथमिकता देण्याचे आदेश केंद्र सरकारचे आहेत. त्यामुळे हॉटेल व्यवसाय संदर्भात आम्ही काहीही करू शकत नाहीत. हॉटेल व्यवसायिकांनी केरोसीन वापरण्याचं आम्ही आवाहन केलं होतं, मात्र आच्या सर्व यंत्रांना बदलाव्या लागतील असं त्यांनी सांगितलं आहे. गॅस सिलेंडरचा काळाबाजार होऊ नये यासाठी आम्ही पुरवठा अधिकार्‍यांना निर्देश दिलेले आहेत. प्रत्येक विक्रेत्याची कसून चौकशी करा असेही आम्ही त्यांना सांगितले आहे, जगाच्या समोर हा प्रश्न आहे त्यामुळे आपण त्याला काहीही करू शकत नाही, असंही भुजबळ म्हणाले.


कोल्हापुरात घरगुती गॅस सिलेंडरसाठी रांगा: घरगुती गॅससाठी नागरिकांनी गर्दी करू नये असं आवाहन करून देखील कोल्हापुरात दुसर्‍या दिवशी घरगुती गॅस सिलेंडर मिळावा म्हणून नागरिकांनी रांगा लावल्या आहेत. कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की कोणीही अफवांवर विश्वास ठेवून गॅस सिलेंडर साठी गर्दी करू नये. शिवाय जिल्ह्यात कुणीहरी अतिरिक्त साठा करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावरपकडक कारवाई केली जाईल असे सक्त आदेशही जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. केंद्र सरकारने दिलेल्या सूचनेनुसार केवळ हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्थांना व्यवसायिक गॅस देण्यात येत आहेत. हॉटेल्स आणि इतरांसाठी व्यवसायिक गॅस सिलेंडर देणे बंद केला आहे. मात्र कुणीही बेकायदेशीर रित्या साठा करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत.


सोलापुरात घरगुती गॅस घेण्यासाठी लोकांच्या रांगा : सोलापुरातील रामवाडी परिसरातील गॅस घेण्यासाठी लोकांची भली मोठी रांग लागली आहे. इराण- इस्त्राईल युद्धाच्या पार्श्वभूमिवर गॅस तुटवड्याची भीती लोकांच्या मनात आहे. पुढे गॅस मिळेल की नाही या भीतीने ग्राहक ‘ पॅनिक बुकिंग’ करत आहेत. अचानक वाढलेल्या बुकिंगमुळे गॅस कंपनीच्या ऑनलाईन बुकिंग पद्धतीत तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे नागरिक स्वत:च गॅस सिलेंडर घेवून एजन्सीमध्ये येत आहेत.

Comments


bottom of page