top of page

होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणचा थायलंडच्या कार्गो जहाजावर हल्ला

अमेरिका, इस्त्रायल- इराणमध्ये सुरू असलेले युद्ध दिवसेंदिवस वाढत असून आखाती देशातील संघर्ष टोकाला पोहचला आहे. त्यातच इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीवर लक्ष ठेवून आहे. बुधवारी, इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीत एका थायलंडच्या मालवाहू जहाजाला लक्ष्य केले. या हल्ल्यात माहलवाहू जहाजाचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. जहाजावर तेवीस क्रू मेंबर्स होते. यापैकी वीस क्रू मेंबर्सना वाचवण्यात आले आहे तर तीन क्रू मेंबर्स बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. महत्वाचं म्हणजे थायलंडचे कार्गो जहाज गुजरातच्या एका बंदरावर येणार होेते.


रॉयल थायलंड नेव्हीनेही हल्ल्याबाबत एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनानुसार, थाय कंपनी प्रेशियस शिंपिंग पीसीएलचे मुयरी नाही जहाज, संयुक्त अर अमिरातातील खलिफा बंदरातून निघाले होते आणि भारतातील कांडला बंदराकडे जात असताना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाताना त्यावर हल्ला करण्यात आला.


रॉयल थायलंड नेव्हीने जारी केलेल्या छायाचित्रांमध्ये जहाजाच्या हल आणि सुपरस्ट्रक्चरमधून जाड काळा धूर निघत असल्याचे आणि आजूबाजूच्या पाण्यात लाईफफॅ राफ्ट्स तरंगताना दिसत आहेत. रॉयल थाय नेव्हीने एका निवेदनात म्हटले आहे की,

हल्ल्याचे विशिष्ट तपशील आणि कारण सध्या तपासाधीन आहे. कोणत्याही गटाने जबाबदारी स्वीकारलेली नाही.


अज्ञात प्रक्षेपणाचा अघात : रॉयल थाई आणि युनायटेड किंग्डम मेरीटाईम ट्रेड ऑपरेशन्स या दोघांनीही 11 मार्च रोजी होर्मुझच्या सामुद्रधुनीत एका मालवाहू जहाजावर एका अज्ञात प्रक्षेपणाचा आघात झाल्याचे वृत्त दिले आहे. आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेने जहाजाच्या हल आणि सुरपस्ट्रक्चरची पडताळीण केली. ज्यामध्ये त्याचाा क्रमांक देखील समाविष्ट आहे. जो त्यांच्या संग्रहातील छायाचित्रांशी जुळतो. सागरी नोंदीनुसार, हे जाहाज प्रेशियश शिंपिंगच्या मालकीचे आहे.


गुजरातकडे जात होती कार्गो : जहाज ट्रॅकिंग वेबसाइट्सनुसार, मयुरी नारी हे जहाज ओमानच्या किनार्‍यापासून होर्मुझच्या सामुद्रधुनीत ताशी 1 नॉटिकल मैलपेक्षा थोडे जास्त वेगाने जात होते. त्यांनी अहवाल दिला की 178 मीटर लांब आणि 30000 टन वजनाचे हे जहाज भारतातील कांडला येथे जात होते.


हल्ल्यात वापरलेल्या प्रक्षेपणाची चौकशी सुरू : रॉयल थाई नेव्हीने म्हटले आहे की, हल्ल्यात एक अज्ञात प्रक्षेपणाचा समावेश होता आणि हल्ल्याची परिस्थिती निश्चित करण्यासाठी तपास सुरू आहे. होर्मुझची सामुद्रधुनी हा एक महत्वाचा सागरी मार्ग आहे ज्यातून जगातील ऊर्जा पुरवठ्याचा मोठा भाग जातो. तथापि, इराणवर अलिकडेच झालेल्या अमेरिका आणि इस्त्रायली हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव हा मार्ग बंद करण्यात आला आहे. फक्त काही जहाजेच वाहतूक करत आहेत.

Comments


bottom of page