कोरोनानंतर आता निपा व्हायरसचा थरार!
- Navnath Yewale
- Jul 7
- 2 min read
केरळमध्ये अढळले 425 रुग्ण; सर्व रुग्ण आयसोलेशनमध्ये

केरळमध्ये निपाह विषाणूचा संसर्ग पसरू लागला आहे, ज्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोनानंतर, एकीकडे लोक विषाणूशी संबंधित प्रत्येक बातमीवर त्वरित प्रतिक्रिया देऊ लागले आहेत, तर निपाह विषाणूची तीव्रता त्याला आणखी धोकादायक बनवत असल्याचं चित्र समोर आलं आहे. हा विषाणू केवळ वेगाने पसरत नाही, तर त्याचा मृत्यूदरही खूप जास्त आहे. यावेळी मलप्पुरम, पलक्कड आणि कोझिकोड जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत आणि 425 हून अधिक लोकांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. सरकारने आयसोलेशन, ट्रॅकिंग आणि चचणीची प्रक्रिया वेगाने केली आहे. निपाह विषाणू म्हणजे काय, त्याची लक्षणे काय आहेत आणि ते रोखण्यासाठी कोणते उपाय आहेत यावर तज्ज्ञांनी खुलासा केला आहे.
आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, आतापर्यंत 425 हून अधिक लोकांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. यामध्ये मलप्पुरम 228, पलक्कड 110, आणि कोझिकोड 87 लोकांचा समावेश आहे. रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे आणि सर्वांचे नमुने घेऊन त्यांची चाचणी घेण्यात येत आहे. राज्य सरकारने हाय अलर्ट जारी केला आहे. आणि संवेदनशील भागात वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत.
दरम्यान निपाह विषाणू हा एक झुनोटिक विषाणू आहे, जो प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरतो, तो प्रामुख्याने फळे खाणार्या वटवाघळांपासून पसरतो आणि मानवांमध्ये श्वसनाच्या समस्या, उच्च ताप आणि मेंदुमध्ये सूज यासारख्या गंभर समस्या निर्माण करू शकतो.
निपाह विषाणूची लक्षणे :
उच्च ताप, डोकेदुखी अणि स्नायू दुखणे, थकवा आणि अशक्तपणा, श्वास घेण्यास त्रास, उलट्या किंवा मळमळ, मानसिक गोंधळ किंवा बेशुद्धी
निपाह विषाणू कसा पसरतो:
संक्रमित वटवाघळांनी खाल्लेल्या किंवा त्यांच्या थुंकीने संक्रमित झालेल्या वस्तुंना स्पर्श करून किंवा खाऊन, संक्रमित मानवांशी थेट संपर्क साधून, संक्रमित प्राण्यांशी संपर्क साधून
प्रतिबंधक पद्धती :
वटवाघळांनी खाल्लेली पडलेली फळे खाऊ नये, आजारी व्यक्तींपासून अंतर ठेवणे मास्कचा वापर करणे, साबणाने वारंवार हात धुवा किंवा सॅनिटाईझ करा, शरीरात कोणातीही लक्षणे अढळल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा, प्राण्यांपासून, विशेषत: शेतात, अंतर ठेवा, सरकार आणि आरोग्य विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करा.



Comments