कोल्हापुरच्या बिंदू चौकतील पुरोगामी संघटनांचे आंदोलन चिघळले; पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज
- Navnath Yewale
- 4 hours ago
- 1 min read

कोल्हापूर : शिवसेना शिंदे गटाचे सिंदखेड राजा (बुलढाणा) चे आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी कोल्हापूरात सोमवारी (दि.27) पुरोगामी संघटनेच्या वतिने आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलकांनी पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांकडून जमाव पांगवण्यासाठी लाठी चार्ज केला. बिंदू चौक परिसरता पोलिसांचा अतिरिक्त फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या ‘ शिवाजी कोण होता’ या पुस्तकावरुन प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ व धमकी दिल्याच्या ऑडिओ क्लिप प्रकरणी पुरोगामी आमदार संजय गायकवाड यांच्या वर दखलपात्र गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पुरोगामी संघटनांच्या वतिने शहरातील बिंदू चौकात आंदोलन सुरू होते. आंदोलकांनी आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याच्या प्रयत्नाला पोलिसांनी रोखले. आक्रमक आंदोलकांसह जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
आंदोलक आक्रमक झाल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. संतप्त आंदोलकांनी ‘कोल्हापूर पोलिसांचा धिक्कार असो’ अशी घोषणाबाजी केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज करावा लागल्याचे पोलिस अधिकार्यांनी सांगितले. सध्या बिंदू चौक परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तणावपूर्ण शांतता आहे.



Comments