top of page

धुळे जिल्हा प्रशासनाने एआय आधारित ई-सुविधा पोर्टलचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शिरपूर येथे लोकार्पण

Apr 26
1 min read

शिरपूर: धुळे जिल्हा प्रशासनाने एआय आधारित तयार केलेल्या ई-सुविधा पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिरपूर येथील कार्यक्रमात लोकार्पण करण्यात आले. यावेळी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, वस्तोद्योग मंत्री संजय सावकारे आदी मान्यवर उपस्थित होते.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या या पोर्टलबद्दल पालकमंत्री जयकुमार रावल, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी या पोर्टलची माहिती देताना सांगितले की, मुख्यमंत्री महोदयांच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नंस सुधारणा कार्यक्रम, 100 टक्के ई-गव्हर्नन्स, टीसीएच तत्वे, तहसील ते मंत्रालय कार्यक्षमता या

दृष्टीकोनातून प्रेरणा घेऊन पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाने, जिल्हाधिकारी कार्यालय धुळे यांनी ई-सुविधा हे कृत्रिम बुद्धीमत्ता आधारित जिल्हा व्यवस्थापन पोर्टल विकसित केले असून अशा प्रकारचा उपक्रम राबविणारा धुळे हा देशातील पहिला जिल्हा आहे.

Comments


bottom of page