कोल्हापूरात महविकास आघाडीत फूट; राष्ट्रवादी (श.प)बाहेर पडणार !
- Navnath Yewale
- Dec 27, 2025
- 1 min read

कोल्हापुर : राज्यातील महाविकास आघाडी बनली त्याच कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडी फुटली आहे. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतून बाहेर पडणार आहे. समाधानकारक जागा न मिळाल्याने राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आता आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी यांची तिसरी आघाडी निर्माण झाली आहे.
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवेसना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून एकम झालं आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं जागा वाटपावरून बिनसलं. दरम्यान, जागावाटपावरून शरद पवार पक्षाच्या पदाधिकार्यांनी काँग्रेसचे विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांना 25 तारखेला अल्टिमेटम दिला होता.
जर सन्मानजनक तोडगा काढणार नसाल, तर आम्ही तिसरी आघाडी करण्यासाठी सक्षम आहोत, असा इशरा राष्ट्रवादीने दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी महाविकास आघाडीमध्ये 14 जागांची मागणी केली होती. मात्र या जागा देण्यात असमर्थता दर्शविल्याचे सतेज पाटील म्हणाले. आमच्या पक्षाला दाबवण्यचा प्रयत्न सुरू आहे. काल महाविकास आघाडीची पत्रकार परिषद असूनही आम्हाला म्हणजेच राष्ट्रवादीला बोलावलं नव्हतं. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीसह सतेज पाटील यांना अल्टीमेटम देत आहोत असं बैठकीस उपस्थित नेत्यांनी दिला .



Comments