क्वांटम तंत्रज्ञानात आत्मनिर्भर भारताची मोठी झेप ...!
- Navnath Yewale
- 5 days ago
- 1 min read

भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डिआरडिओ) देशातील क्वांटम तंत्रज्ञानाच्चया क्षेत्रात एका अत्याधुनिक संशोधन केंद्राचे उद्घाटन करून नवीन उंची गाठली आहे. हे केंद्र नवी दिल्लीतील मेटकाफ हाऊस येथे स्थापन करण्यात आले आहे आणि भारताच्या स्वदेशी क्वांटम क्षमतांना, विशेष: धोरणात्मक आणि सुरक्ष संबंधित कामांसाठी, बळकट करण्याचे उदिष्ट आहे.
या नवीन संशोधन केंद्रात अत्याधुनिक तांत्रिक आणि प्रायोगिक सेटअप आहेत. जे क्वांटम विज्ञानाच्या कठीण क्षेत्रात संशोधन आणि विकासाला नवीन चालना देतील. (डिआरडिओ) सचिव आणि अध्यक्ष, समीर व्ही कामत यांनी सुविधेचे उद्धाटन केले, जे देशाच्या सुरक्षा आणि रनणनितीसाठी अत्यंत महत्वाचे आहे.
क्वांटम संशोधनला उच्च तंत्रज्ञानाचा पाठिंबा
हे संशोधन केंद्र अल्ट्रा-आधुनिक प्रायोगिक सेटअपने सुसज्ज आहे, जे भारतात क्वांटम तंत्रज्ञानाशी संबंधित संशोन आणि विकास वेगाने वाढविण्यास मदत करेल. येथे, क्वांटम भौतिकशास्त्राच्या अनेक महत्वाच्या पैलूंवर सखोलपणे काम केले जाईल. ज्यामुळे देशाचे संरक्षण तंत्रज्ञान आणि संप्रेषण प्रणाली अत्याधुनिक होतील. हे सर्व महत्वाचे उपक्रम (डिआरडिओ) च्या वैज्ञानिक विश्लेषन गटाद्वारे चालवले जात आहेत. जे क्वांटम सुरक्षा आणि संप्रेषण स्वयंपूर्ण करण्यासाठी काम करत आहे. हे केंद्र सॉलिड स्टेट फिजिक्स लॅबोरेटरीच्या नेतृत्वाखाली काम करते आणि अनेक मूलभूत तंत्रज्ञानांवर देखील लक्ष केंद्रित करते.
क्वांटम तंत्रज्ञान म्हणजे काय?
क्वांटम तंत्रज्ञान हे क्वांटम मेकॅनिक्सच्या तत्वांवर आधारित एक नवीन तंत्रज्ञान आहे, जे सूक्ष्म- कणांच्या अद्वितीय गुणधर्मांचा वापर करते. हे तंत्रज्ञान संगणन, संप्रेषण, संवेदन आणि क्रिप्टोग्राफी सारख्या क्षेत्रात पारंपारिक तंत्रज्ञानापेक्षा जलद आणि सुरक्षित उपाय विकसित करते.
क्वांटम की वितरण सारख्या तंत्रज्ञान अत्यंत महत्वाच्या आहेत. विशेष: राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात, कारण ते अत्यंत सुरक्षित डेटा ट्रांन्समिशन सुनिश्चित करतात. जे भविष्यातील सायबर सुरक्षेसाठी आवश्यक आहे. अशाप्रकारे डिआरडिओ चे हे नवीन क्वांटम तंत्रज्ञान संशोधन केंद्र भारताला क्वांटम तंत्रज्ञानाच्या क्ष——ेत्रात स्वालंबी आणि धोरणात्मकदृष्ट्या मजबूत बनवण्याच्या दिशेने एक मोठी झेप आहे.
Comments