top of page

शिवसेना, आप, तृणमूल काँग्रेसनंतर आणखी एक पक्ष फुटणार?भाजकडून आमदारांना मंत्रिपदासह 30 कोटींची ऑफर; मुख्यंत्र्याच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्लीनंतर आता आणखी एका राज्यातील राजकीय पक्षात भाजप सुरूंग लावण्यात तयारीत आहे. होय, जम्मू- काश्मिर मधील आमदारांना थेट 30 कोटी रुपयांची ऑफर दिली जात आहे, आ अरोप खुद्द मुख्यमंत्र्यांनी केला आहे. जम्मू- काश्मिरचे मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी आरोपक ेला आहे की, पक्षांतर करण्यासाठी भाजपतर्फे नॅशनल कॉन्फरन्सच्य आमदारांना 20 ते 30 कोटी रुपये, मंत्रिपद आणि राज्याचा दर्जा देण्याची ऑफर देण्यात आली होती.


तसेच, “आमचा संयम आणि सभ्यता यांची परीक्षा घेऊ नका, ” असा इशाराही ओमर अब्दुल्ला यांनी केंद्र सरकार आणि भाजपला दिला आहे. ओमर अब्दुल्ला हे श्रीनगरमधील हजरतबल येथे आयोजित ‘ मादर-ए मेहबान’ दिन रॅलीत पक्षातील कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. योवेळी त्यांनी भाजपला गंभीर इशारा दिला आहे. नॅशनल कॉन्फरन्समध्ये फूट पाडण्याचा आणखी एक प्रयत्न केला जात असल्याचा अरोप ओमर यांनी केला. भाजपाचा पैशाची ऑफर देण्याचा पहिला प्रयत्न फसल्यानंतर आता आमच्या पक्षातील आमदारांना बंद खोलीत नेऊन त्यांना कोट्यावधी रुपये देण्याची ऑफर देत आहात.


एवढेच नाहि तर, जम्मू- काश्मिर राज्याचा दर्जा मिळवून देऊ अशी ऑफर देत आहात, असे आमेर आब्दुल्ला म्हणाले. भाज़प कशावप्रकारे आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करत आहे. याची माहिती पक्षातील एका आमदाराने दिली आहे. सर्वोच्च न्यायालयातील एक वकील, जे भाजपचे पदाधिकारीही आहेत, त्यांनी जम्मूतील आपल्या एका आमदाराशी संपर्क साधला होता, असा आरोप मुख्यमंत्री ओमर यांनी केला.


“ जर तुम्हि आमच्यात सामील झालात, तर आम्ही तुम्हाला 20-30 कोटी रुपये, एक मंत्रिपद आणि राज्याचवा दर्जा देऊ, असं आमदारांना सांगण्यात आले होते. यसा गोष्टीला अल्लाह सुद्धा साक्षीला आहे. कार्यक्रमावेळी बोलताना मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला भाजपला इशारा देत म्हणाले, भाजपला वाटते की या लोकांची निष्ठा खूप स्वस्त आहे. “ या मंचाकडे पाहून घ्या येथे असा कोणीही दिसणार नाही जो 20 कोटी किंवा अगदी 100 कोटी रुपयांसाठी आपली निष्ठा विकायला तयार असेन,” ते पुढे बोलताना म्हणाले, “ आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, ‘ बाबा-ए- कौम’ शेख मोहम्मद अब्दुल्ला ‘ माद्रे मेहरबान’ आणि फारुख अब्दुल्ला यांनी मला हेच शिकवले आहे की, या जगात आपल्या कृत्यांचे उत्तर द्यावे लागो वा न लागो, पण एक दिवस असा येईल जेव्हा आपल्याला अल्लाहसमोर उत्तर द्यावेच लागेल.”


तसेच भाजपनं आपल्याला कमकूवत समजू नये, ते मागच्या दाराने प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मागच्या दाराने येऊन ते पुढच्या सीटवर बसू शकणार नाहीत. सध्या तरी जनतेने त्यांना मागेच ठेवले आहे आणि तुम्ही मागेच राहाल असेही ओमर अब्दुल्ला म्हणाले.

Comments


bottom of page