top of page

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय: नवजात बाळांना सोन्याची अंगठी, 1,28,499 अंगठ्यांची ऑर्डर

Aug 24
1 min read

तमिळनाडू सरकारने नवजात बालकांसाठी राबविण्यात येणार्‍या थाई सुवर्ण अंगठी योजना’ अंतर्गत सोन्याच्या अंगठ्या खरेदी करण्यासाठी जॉय अकुक्कास आणि कल्याण ज्वेलर्स या दोन सोन्याच्या कंपन्यांना काम दिले आहेत. माजी मुख्यमंत्री सी.एन. अण्णादुराई यांच्या जयंतीनिमित्त 15 सप्टेंबर रोजी यास योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. सरकारने दिलेल्या महितीनुसार, तामिळनाडू मेडिकल सर्व्हिसेस कॉर्पोरेशनने जून ते सप्टेंबर या कालावधीतील लाभार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या 1 लाख 28 हजार 499 सोन्याच्या अंगठ्यांच्या पुरवठ्यासाठी जॉय अकुक्कास आणि कल्याण ज्वेलर्स यांना अनुक्रमे 70:30 या प्रमाणात कार्यादेश दिले आहेत.


मुख्यमंत्री थलपती यांचे निवडणुकीपूर्वी दिले होते अश्वासन: मुख्यमंत्री विजय थलपती यांनी एप्रिलमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू करणार असल्याचे अश्वासन दिले होते. याची पूर्तता त्यांनी आज केली असून सरकारी रुग्णालयांमध्ये जन्मलेल्या नवजात बालकांना या योजनेचा लाभ मिळणार असून, सरकारी वैद्यकीय संस्थामंध्ये प्रसूतीला प्रोत्साहन देणे हा योजनचा मुख्य उद्देश आहे. सरकारच्या निवेदनानुसार, प्रत्येकी एक ग्रॅम वजनाच्या तब्बल 4 लाख 41 हजार 667 सोन्याच्या आंगठ्या उपलब्ध करून देण्यांसंदर्भात सरकारने प्रसिद्धी पत्रक काढले होते. त्यानंतर 14 जुलै रोजी टीएनएमएससी ने निविदा प्रक्रिया सुरू केली होती. या निविदेत 11 कंपण्यांनी सहभाग घेता आणि टीएन टेंडर्स पोर्टलद्वारे आपल्या दरांचा तपशील सादर केला.


जॉय अलुक्कासने एक ग्रॅम सोन्याच्या किमतीव्यतिरिक्त प्रक्रिया शुल्क, विमा, वाहतूक आणि भारतीय मानक ब्युरोच्या (बीआयएस) हॉलमार्किंगसह इतर सर्व अतिरिक्त शुल्कांसाठी केवळ0.01 रुपयांची सर्वात कमी बोली लावली होती. तमिळनाडूच्या संबंधित निविदा नियमांनुसार कल्याण ज्वेलर्सनेही सर्वात कमी दराची बोली सादर केली.ही योजना 15 सप्टेंबर 2026 रोजी सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे जूनपासूनच्या चार महिन्यांतील लाभार्थ्यांना 1 लाख 28 हजार 499 सोन्याच्या आंगठ्या उपलब्ध करून देण्यासाठी दोन्ही कंपन्यांना 70:30 या प्रमाणात कार्यादेश देण्यात आले आहेत. 22 जून 2026 पासून सरकारी रुग्णालयांमध्ये जन्मलेल्या बालकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Comments


bottom of page