खरात प्रकरणाचा भांडा फोड आम्हीच केला, सर्वात जास्त पुरावे माझ्याकडे - मुख्यमंत्री फडणवीस
- Navnath Yewale
- 3 days ago
- 2 min read

मुंबई : सध्या संपूर्ण राज्यात गाज असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. अशोक खरात प्रकरणामुळे विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांना खडे बोल सूनावले आहेत. खरात प्रकरण गंभीर असूनल या प्रकरणाचा भांडाफोड आम्हीच केला आहे. या प्रकरणाचा कसून तपास सुरू असून आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जाईल. फोटो कोणाचे कोणासोबत असू शकतात पण सर्वात जास्त पुरावे माझ्याकडे असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांची चांगलीच फिरकी घेतली.
नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाविषयी माध्यमांना प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘ खरात प्रकरणाचा आम्हीच भांडाफोड केला आहे. या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी होत आहे. यामध्ये एसआयटी तयार केली आहे. नाशिक पोलिस आणि एसआयटी मिळून तपास करत आहेत. या प्रकरणात कोणत्याही परिस्थितीत कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही. कुणाकडे काही पुरावा असेल तर त्यांनी समोर यावे. या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये. या प्रकरणाविषयी सगळ्यात जास्त पुरावे माझ्याकडे आहेत.
या प्रकरणावर टीका करणार्या विरोधकांना फडणवीसांनी खडेबोल सुनावले. ते म्हणाले की, ़‘कोणकाण विरोधक तिकडे गेले मला माहिती आहे. खरातचे कुणासोबत संबंध याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. कुणाचा कुणासोबतही फोटो असू शकतो. खरातला कुणी भेटले म्हणून त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकत नाही. खरातच्या संस्थेला 40 किलोमिटरपर्यं पाण्याची लाईन देण्यासंदर्भातही चौकशी होईल. आपल्या तथाकथीत शक्तींचा वापर करून महिलांना फसवणं योग्य नाही. त्याची शिक्षा त्याला भोगावी लागेल. ज्यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावून 40 किलोमिटर दूर पाणी दिले.
तसंच , या प्रकरणात काहींना राजकारण करायचे आहे. पण आम्हाला राजकारणांत इंटरेस्ट नाही. ज्या महिलांसोबत त्याने दूरव्यवहार केला आहे त्यांना आम्हाला न्याय द्यायचा आहे. लाजेखातर किंवा सामाजिक दबावामुळे महिला पुढे येत नाहीत. या प्रकरणात पिडितांना धीर देऊन त्यांच्या घरच्यांना धीर देऊन पुढे आणले जात आहे. खरातच्या संस्थेला पाणी देण्याच्या निर्णयाची चौकशी करायची आहे पण पहिल्यांदा आम्हाला महिलांना न्याय द्यायचा आहे. खरात प्रकरणी कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरात प्रकरणी राजकीय टीका करणार्यांची फिरकी घेतली.



Comments