घरगुती गॅस सिलेंडरबाबत मोठा निर्णय; केंद्र सरकारकारचे गॅस कंपन्यांना आदेश घरगुती सिलेंडरमधील गॅसचे प्रमाण कमी होणार; व्यवसायिक एलपीजी पुरवठ्यात 20 टक्क्यांनी वाढ
- Navnath Yewale
- 4 hours ago
- 2 min read

मुुंबई : घरगुती गॅस सिलिंडरच्या वितरणात महत्वाचा बदल करण्याचे सरकारेन ठरवले आहे. घरगुती वावराचा गॅस सिलिंडर नागरिकांना अता अर्ध्याच वजनाचा मिळणार आहे. घरगुती वापराचा गॅस 14.2 किलोच्या प्रमाणात नागरिकांना देण्यात येतो. मात्र आता हा घरगुती वापराचा गॅस 8 ते 10 किलोच्या प्रमाणात नागरिकांना देण्यात येणार आहे. सिलिेंडर तोच राहणार आहे. मात्र, त्यामध्ये गॅस आठ ते दहा किलोच्या प्रमाणात भरण्योच आदेश गॅस कंपन्यांना देण्यात आले आहेत. जेवढा गॅस असेल तेवढे पैसे आकरले जाणार आहेत. युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या भरून तयार असलेले 14.2 किलोचे सिलेंडर संपल्यांनतर नवीन सिलेंडर आठ ते दहा किलोच्या प्रमाणात भरण्यात येणार आहेत. यापुढे गॅस सिलेंडर कमी वजनाचे असल्याने ते साहजिकच कमी दिवस पुरणार आहेत. त्यामुळे सामान्य घरातील दैनंदिन गणित बिघडणार आहे. यावर सामान्य नागरिक कशाप्रकारे व्यक्त होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. याशिवाय कमी वजनाच्या या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत किती असणार याकडेही सगळ्यांचे लक्ष आहे.
इराण विरुद्ध अमेरिका-इस्त्रायल यांच्यातील युद्धाचा संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये इस्तायलने इराणमधील गॅस फिल्ड आणि खनिज तेलाचे साठे असलेल्या परिसरांमध्ये हवाई हल्ले केले आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने कतारमधील सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा साठा असलेल्या परिसराला लक्ष्य केले आहे. यामुळे युद्ध संपल्यानंतरही या सुविधा पूर्ववत होण्यासाठी बराच वेळ जावा लागेल. त्यामुळे पुढील काही महिने जगभरात गॅसची टंचाई असेल, असा अंदाज आहे. या पार्श्वभूमिवर आता केंद्र सरकारने आवश्यक ती पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये एलपीजी गॅसच्या तुटवड्याच्या भीतीने नगरिकांनी अनेक ठिकाणी गॅस एजन्सीबाहेर रांगा लावल्याचे दिसून आले होते. सरकारने वारंवार आवाहन करुनही नगारिकांना घरगुती सिलेंडर मिळणार की नाही, याबाबत धास्ती कायम आहे. दरम्यान गॅसच्या तुटवड्यामुळे सरकारने व्यावसायिक वापराच्या एलपीजीसाठी गॅस पुरवठा बंद केला होता. त्यामुळे हॉटेल इंडस्ट्रीवर गंडांतर आले. मात्र, आता मध्यपूर्वेतील (इराण-इस्त्रायल) यद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेली गॅस टंचाई दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने व्यावसायिक एलपीजी पुरवठ्यात 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील हॉटेल्स, ढाबे आणि अन्न प्रक्रिया उद्योगांना मोठा दिलासा मिळणार असून, वाढीव पुरवठा तत्काळ लागू करण्यात आला आहे.
दरम्यान आखाती देशातील युद्घाचा परिणाम भारतातील व्यावसायसावर झाले आहेत. नांदेडमधील मिनरल पाणी बॉटल तयासर करणार्या व्यवसायावर याचे परिणाम दिसून येत आहेत. बॉटल साठी लागणारे रॉ मटेरीयलची आयात बंद आहे. प्रीफॉर्म, कॅप, लेबल, रॅपर रोल यांचे 60 टक्क्याने दर वाढले आहेत. त्यामुळे बाटलीच्या दरात वाढ झाली आहे. मात्र याचा फटका सामान्य नागरिकांना बसणार नाही तर रिटेलर आणि डीलर यांना बसणार आहे. पूवीृ 85-90 रुपयांना मिळणारे पाण्याचे बॉक्स आज 100-120 रुपयांना विक्रि होत आहेत. दरम्यान अशीच युद्धाची परिस्थिती राहिली तर व्यवसाय बंद होण्याची भीती मिनरल बॉटल व्यावसायिकांतून व्यक्त होत आहे.



Comments