खांद्यावर शिवळाटं, डोक्यावर तुरपिकाचा कडप घेवून आक्रोश! उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतीमालाला हमी भाव, खरेदी केंद्र सुरू करावीत, कवडीमोल खरेदीतून लूट थांबवा - शिवसेना (उबाठा)
- Navnath Yewale
- Jan 5
- 1 min read

बीड: यंदा अतिवृष्टीने खरिपाच्या उत्पादनात पटीने घट तर झालीच पण बहूतांश शेतकर्यांचे खरिपाचे पिकच हिरावले. आधीच संकटाशी दोन करताना कर्जाच्या खाईत लोटला गेलेला शेतकर्यांची कवडीमोल शेतमाल खरेदीतून लूट सुरू आहे. कापुस, तूर, गहू हरभरा या उत्पादनाची शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात यावी यासह इतर मागण्यासांठी तालुकाप्रमुख सोपान मोरे, उपजिल्हा प्रमुख अजिनाथ खेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज अभिनव आंदोलन करण्यात आले.
बीडच्या शिरुर कासार शहरातील जिजामाता चौकात शिवसेना (उबाठा) च्या वतिने तालुका प्रमुख सोपान मोरे, उपजिल्हा प्रमुख अजिनाथ खेडकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी अभिनव आंदोलन करण्यात आले. खांद्यावर शिवळाटं व डोक्यावर तुर पिकाचा कडप घेवून आंदोलकांनी प्रशासनाचे मागण्यांकडे लक्ष वेधले.
संकटाने पिचलेल्या शेतकर्यांची लूट थांबवण्यासाठी शेती उत्पादनाच्या तुलनेत शेतीमालास हामी भाव खरेदी केंद्र सुरू करण्यात यावीत, बाजार समितीत रास्त भावाने शेतीमालाची खरेदी करण्यात यावी, खरेदी- विक्रीसाठी ऑनलाईन शिथील करून शेतीमालाची थेट खरेदी-विक्री करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. दरम्यान, शेतकर्यांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेवून येत्या आठ दिवसांत मागण्यांची पुर्तता करण्यात यावी अन्यथा शिवसेना (उबाठा) स्टाईलने तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला. आंदोलकांनी तहसीलदार सुरेश घोळवे यांना मागण्यांचे निवेदन दिले, यावेळी शिवसेनेचे हरी मामा खेडकर, युवासेना तालुकाप्रमुख साईनाथ ढाकणे, सहकार सेना जिल्हाप्रमुख ठकसेन तुपे, अल्पसंख्यांक उपजिल्हाप्रमुख लालाभाई पठाण यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Comments