खासदार बंडू जाधव यांनी आयुष्यातली सर्वात मोठी चुक केली, याचा बदला आम्ही मुंबईत घेऊ- जरांगे पाटील

आतरवाली: उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात सामिल झालेले परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव यांच्या वतिने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत परभणीमध्ये रविवारी (दि.30) शेतकरी, युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यामध्ये खासदार जाधव यांच्या नेतृत्वात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सेनेचे पदाधिकारी शिंदे सेनेत प्रवेश केला, तत्पूर्वी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या कार्यक्रमावर आक्षेप घेत संजय जाधव यांना कार्यक्रम तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. यावेळी खासदार संजय जाधव यांचा एकेरी शब्दात उल्लेख करत बंडू जाधव यांच्या या षडयंत्राचा बदला मुंबईत घेवू असा ईशाराही त्यांनी यावेळी दिला.
आंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेले जरांगे पाटील यांना परभणी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत खासदार संजय जाधव यांच्या वतिने शेतकरी मेळाव्याचे आयोजन केल्याचे माध्यमांच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आले. यावेळी जरांगे पाटील यांनी आक्रमक होत खासदार संजय जाधव यांच्याशी फोनवर संवाद हा कार्यक्रम तात्काळ रद्द करा, अन्यथा मी तिथे येईल असा निर्वाणीचा इशारा दिला.
जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले, मी कोणावर चाल करून जात नाही. आमच्या मराठ्यांची हक्काची प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे तो कार्यक्रम तात्काळ रद्द करा. अन्यथा मी तिथे येईल, असा इशारा देत मनोज जरांगे प्रचंड आक्रम झाल्याचे दिसून आले. दरम्यान, उपोषण सुरू असताना परभणीकडे जाण्याची तयारी जरांगे यांनी दाखवल्याने काही वेळात त्यांचा ताफा सज्ज करण्यात आला होता.
मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करून परभणीत शेतकरी मेळाव्याचा कार्यक्रम घेवून एक प्रकारे मराठ्यांना खुन्नस देण्याचा प्रकार आहे. शिरसाठ आणि एकनाथ शिंदे यांना राज्य अस्थिर करायचं आहे. त्यासाठी शिरसाठ यांच्या सांगण्यावरून बंडू जाधव यांनी मेळाव्याचे आयोजन केल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. संजय जाधव मराठ्यांच असून मराठ्यांच्या उरावर नाचत आहे. तेच एकनाथ शिंदेंना घेवून परभणीला गेले असेल. त्यांच्यासाठी काय केलं हे त्यांना माहिती नाही. आता पुढच्या वेळेला त्यांना घरी बसवल्यावर कळेल. एकनाथ शिंदे येत आहेत तो कार्यक्रम रद्द करा असे म्हणत जरांग पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परभणीचे खासदार संजय जाधव यांच्यावर टीका केली. कार्यक्रमात मी आलो तर त्यांची पंचाईत होईल. त्यामुळे त्यांना म्हणाव कार्यक्रम होत नाही म्हणून रद्द करा. अन्यथा पुन्हा राज्य अस्थिर होईल. मग तुमच्यावर खापर फुटेल असंही जरांगे यावेळी म्हणाले.
शिरसाठांचं ऐकून संजय जाधव यांनी मराठ्यांच्या उरावर हा कार्यक्रम अयोजित केला आहे. संजय जाधव यांनी हा कार्यक्रम घेवून आयुष्यातली सर्वात मोठी चुक केली आहे. या कार्यक्रमाचा बदला आम्ही मुंबईत घेवू. याचे परिणाम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भोगावेच लागतील असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.



Comments