गुजरातमध्ये वडोदर्यात महिसार नदीवरील पूल कोसळला
- Navnath Yewale
- Jul 9
- 2 min read
दुर्घटनेत वाहनं नदीत कोसळली, एक टँकर पूलावर आडकले; 9 जणांचा मृत्यू , 6 जण जखमी

विकासाच्या नावाखाली देशात मोठ्या थाटामाटात पायाभरणी केली जाते.पंरतु बांधकामाच्या गुणवत्तेचा आणि देखरेचीचा विचार केला तर सर्व काही देवाच्या दयेवर सोडले जाते. गुजरातमधील वडोदरा येथील महिसागर नदीवर बांधलेला गंभीर पूल हे याचे अलिकडील आणि लज्जास्पद उदाहरण आहे. ज्या पुलावरून वाहने धावत होती, लोक त्यांचे दैनंदिन काम करत होते. तो अचानक मध्येच तुटला. अनेक वाहने नदीत पडली आणि काही पुलाच्या मध्यभागी धोकादायकपणे लटकत होती, जणू विकासालाही उभे रहावे की पडावे याबद्दल गोंधळ आहे.
हाच तो पूल आहे जो वडोदरा आणि आणंद सारख्या महत्वाच्या शहरांना जोडतो. परंतु देशाच्या अनेक भागात घडत आहे, तसे येथेही बांधकामाची ताकद कागदावर दाखवण्यात आली आणि प्रत्यक्षात ते काहीतरी वेगळेच होते. कंत्राटदाराचा हेतू, अधिकार्यांची मौनता आणि यंत्रणेचा निष्काळजीपणा या सर्वांनी या पुलाचे अपघातस्थळ बनविण्यात भूमिका बजावली.
गुजरातमधील वडोदार येथील महिसागर नदीवर बांधलेल्या गंभीर पुलाचा जो व्हिडिओ समोर आला आहे, तो अपघापेक्षा इशारा देणारा आहे. पुलाच्या मध्यभागी एक ट्रक अडकला आहे. त्याच्या पुढचा रस्ता हवेत नाहीसा झाला आहे आणि मागच्या पुलात खोल भेगा पडल्या आहेत, जणू काही तो सरकारच्या धोरणांवर आणि देखरेखीच्या यंतणेवर शांतपणे टीका करत आहे. ज्यावेळी ही दुर्घटना घडली, त्यावेळी पुलावर अनेक वाहने होती. त्यापैकी काही नदीत पडल्याची माहिती समोर आली आहे.
वडोदराचे जिल्हाधिकारी अनिक धामेलिया यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (9 जूलै) सकाळी 8:30 वाजता वडोदरा येथील महिसागर नदीवरील पुल कोसळला. या अपघातात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले आहेत. जखमींना वडोदरा येथील रुग्णालयात उपाचारार्थ दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाचे पथक घटनास्थळी उपस्थित असून बचाव कार्य सुरू आहे.
दरम्यान, दरवर्षी पाऊस पडतो, पण पूल दरवर्षी का तुटतात? त्यांचे आयुष्य आता पावसाळ्यापुरते मर्यादित आहे का? अपघात झाला, प्रशासन घटनास्थळी पोहोचले, चौकशीचे आदेश देण्यात आले आणि नेहमीप्रमाणे तीच स्क्रिप्ट पुनरावृत्ती होत आहे. खरं तर जोपर्यंत फाईलवर स्वाक्षरी करणार्यांची जबाबदारी निश्चित होत नाही आणि जोपर्यंत बांधकाम काम हे उत्पन्नाचे साधन राहील, तोपर्यंत पूल तुटत राहतील आणि लोक आपले प्राण गमवत राहतील. हे आजचे विकास मॉडेल आहे. दिसायला मजबूत आहे. पण प्रत्यक्षात असहाय्य आहे.
Comments