केंद्र सरकारचा 2026-27 चा अर्थसंकल्प जाहीर केंद्रीयअर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडला अर्थसंकल्प: दारू, सिगारेट महागणार, एप्रिलपासून देशात नवा आयकर लागू
- Navnath Yewale
- 2 days ago
- 2 min read

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत 2026-27 चा देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे.परिवहन मंत्रालयाला सार्वात जास्त बजेट वाटप मिळाले आहे. सरकारने परिवहनासाठी 5,98,520 कोटी रुपये वाटप केले आहेत, तर संरक्षण मंत्रालय दुसर्या क्रमांकावर आहे, ज्याला 5,94 585 कोटी रुपये मिळाले आहेत. ग्रामीण विकास मंत्रालय 2,73, 108 कोटी रुपयांसह तिसर्या क्रमांकावर आहे, गृह मंत्रालय 2, 55, 234 काटी रुपयांसह चौथ्या क्रमांकावर आहे, कृषी मंत्रालय 1, 62, 671 कोटी रुपयांसह पाचव्या क्रमांकावर आहे. शिक्षण मंत्रलाय 1, 39, 589 कोटी रुपयांसह सहाव्या क्रमांकावर आहे. उर्जा मंत्रालय 1,0, 029 कोटी रुपयांसह सातव्या क्रमांकावर आहे, आरोग्य मंत्रालय 1, 04, 599 कोटी रुपयांसह आठव्या क्रमांकावर आहे, नगरविकास मंत्रालय 85, 522 कोटी रुपयांसह नवव्या क्रमांकावरअ ाहे आणि आयटी आणि दूरसंचार मंत्रालय 74,560 कोटी रुपयांवर आहे.
काय स्वस्त
कर्करोग आणि मधुमेहावरील औषधी आणि सात दुर्मिळ आजारांवरील औषधी स्वस्त होणार, सौरउर्जेशी संबंधित उत्पदाने स्वस्त होतील, चामडे आणि कापड निर्यात करणे स्वस्त होईल, शूज, बॅटरी आणि मायक्रोवेव्ह ओव्हन स्वस्त होतील, संरक्षण क्षेत्रात मूलभूत सीमाशुल्क माफ केले जाईल.
काय महाग : खनिज,भंगार, अल्कोहल, फ्युचरर्स ट्रेडिंग
आयकरबाबत मोठी घोषणा: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नव्या उत्पन्नकराबाबत मोठी घोषणा केली आहे. इनकम टॅक्स रिटर्न फॉर्म अधिक सोपा केला जाणार आहे, 1 एप्रिल 2026 पासून नवा उत्पन्नकर कायदा लगू होणार आहे, नव्या कायद्यानुसार तांत्रिक त्रुटींसाठी शिक्षा न देता दंड आकारला जाणार आहे, लहान कर उल्लंघनांमध्ये केवळ दंड आकारला जाईल, प्रदेश प्रवासावर आकारला जाणारा कर कमी करण्यात आला आहे, परदेश प्रवासाठी टीसीएस दर 5 टक्के करण्यात आला आहे, 31 जूलैपर्यंत आयकर रिटर्न दाखल करता येणार आहे. नव्या कायद्यात अघोषित उत्पन्नाची मर्यादा 1 कोटी रुयांपर्यंत ठेवण्याचा प्रस्ताव आहे.
अर्थसंकल्पात महिलांसाठी तरतुद: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी महिलांबाबत मोठी घोषणा केली आहे. महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी समुदायाच्या मालकीच्या रिटेल स्टोअर्स म्हणून एसएचई (स्वयंसेवा उद्योजक) मार्टची स्थापना केली जाईल.
हे बजेट म्हणजे अफाट संधीचा महामार्ग- पंतप्रधान मोदी
आज सादर झालेल्या 2026-27 च्या केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत पंतप्रधान मोदी म्हणले की, “ हा अर्थसंकल्प म्हणजे, अफाट संधीचा महामार्ग.. हा अर्थसंकल्प 2047 मध्ये विकसित भारताच्या आपल्या उदंड स्वप्नांचा पाया आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
अर्थसकल्पानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, उत्पादन ते पायाभूत सुविधांपर्यंत, आरोग्य ते पर्यटन, ग्रामीण भाग ते कृत्रिम बुद्धिमत्ता, क्रिडा ते तीर्थस्थळांपर्यंत, डेव्हलप इंडिया बजेट प्रत्येक गाव, शहर आणि शहरातील तरुण, महिला आणि शेतकर्यांचे स्वप्न सक्षम आणि पूर्ण करते.



Comments