top of page

चार राज्याचे राज्यपाल, भाजप उपाध्याक्ष सत्यपाल महिलक यांचे निधन

ree

जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन झाले आहे. एकेकाळी ते भाजपच्या विरष्ठ नेत्यांमध्ये होते आणि पक्षाने त्यांना उपाध्यक्ष बनवले होते. ते चार राज्यांचे राज्यपाल देखील होते. परंतु काही वर्षात मोदी सरकारशी त्यांचे संबंध बिघडत गेलेे. त्यांच्या शेवटच्या काळात त्यांनी पुलवामा हल्ल्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना थेट जबाबदार धरले. त्यांच्या दिर्घ राजकीय आयुष्यात ते खूप वादग्रस्त होते. आणि त्यांना अनेक पक्षांमध्ये त्यांचे राजमीय स्थान मिळाले.


सत्यपाल मलिक यांनी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा दावाही केला होता. त्यांच्या 50 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक पक्ष बदलले. परंतु नेहमीच स्वत:ला जाट समुदयाचे आणि शेतकरी नेते म्हणून वर्णन केले. ते स्व:ला लोहियावादी मानत होते आणि चौधरी चरण सिंग यांना त्यांचे गुरू म्हणत होते.

दरम्यान,24 जूलै 1946 रोजी उत्तर प्रदेशातील बागपत येथील हिसावडा गावात जन्मलेले सत्यपाल मलिक यांच्या वयाच्या अवघ्या दोन वर्षातच वडिलांचे निधन झाले. विद्यार्थीदशेतच ते राजकारणाकडे वळले. त्यांना सक्रिय राजकारणात आणण्याचे श्रेय चौधरी चरण सिंह यांना जाते .


1974 मध्ये चौधरी चरण सिंह यांच्या भारतीय क्रांती दलाच्या तिकिटावर बागपत विधानसभा निवडणुक लढवली आणि वयाच्या 28 व्या वर्षी विधानसभेत पाहेाहेचले. 1980 मध्ये ते लोकदलाच्या तिकिटावर राज्यसभेत पोहोचले. आणिबाणीच्या काळात त्यांनी काँग्रेसला कडाडून विरोध केला आणि तुरुंगातही गेले. शिवाय 1984 मध्ये ते पक्ष बदलून काँग्रेसमध्ये सामील झाले. काँग्रेस सोडून सत्यपाल मलिक यांनी जनमोर्चा पक्ष स्थापन केला आणि 1988 मध्ये त्यांचा पक्ष जनता दलात विलीन केला.


1989 मध्ये सपाच्या तिकिटावर अलिगडमधून निवडणुक लढवली, पण त्यांचा पराभव झाला. 2004 मध्ये ते भाजपमध्ये सामील झाले, परंतु बागपतमधून निवडणुक जिंकू शकले नाहीत. पक्षाने त्यांना 2012 मध्ये राष्ट्रीय उपाध्यक्षपद दिले. त्यांना 2017 मध्ये बिहार, जम्मू आणि काश्मीर ,2019 मध्ये गोवा आणि 2020 मध्ये मेघालयचे राज्यपाल बनवण्यात आले.

शेतकरी चाळवळीनंतर सत्यपाल मलिक आणि भाजपमधील संबंधात कुटता सुरू झाली. मलिक 2022 मध्ये मेघालयाचे राज्यापाल होते आणि या काळात त्यांनी म्हटले होते की, दिल्लीच्या सीमेवर 700 शेतकरी मृत्यूमुखी पडले... कुत्र्याचा मृत्यू झाला तरी त्रास होतो. परंतु दिल्लीतून शेतकर्‍यांसाठभ शोकपत्र आले नाही.


पुलमवामा हल्ल्याबाबत त्यांनी असाही आरोप केला होता की, हा हल्ला केंद्र सरकारच्या निष्काळजीपणामुळे झाला. एवढेच नाही तर त्यांनी असेही म्हटले होते की, भाजपने निवडणुकीत पुलवामाचा फायदा घेतला.


Comments


bottom of page