छगन भुजबळांच्या धमकीला भीक घालत नाही, लक्ष्मण हाके सुपार्या घेवून बोलतात - आमदार प्रकाश सोळंके
- Navnath Yewale
- Sep 21
- 2 min read

माजलगाव मतदार संघाचे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे ज्येष्ठ आमदार प्रकाश सोळंके यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटी येथे भेट घेतली. छगन भुजबळ यांच्या जरांगे च्या व्यासपीठावर गेलेल्यांना आम्ही निवडणुकीत बघू या वक्तव्याचा समाचार घेत हाके हा सुपारी घेवून बोलतो असं आमदार प्रकाश सोळंके म्हणाले.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज मोजक्या समन्वयांची आंतरवाली सराटी येथे बैठक बोलावली होती. बैठकी नंतर आमदार प्रकाश सोळंके यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमदार सोळंके म्हणाले की, आज जरांगे पाटील यांची मुंबई विजयानंतर भेट झाली नव्हती त्यामुळे आज सदिच्छा भेट घेतली. आरक्षणावर विधानं हे राजकारणाचा भाग आहे, काही लोक सुपार्या घेवून विधानं करतात, कोणाच्या सुपार्या घेतात हे माहित आहे योग्य वेळ आल्यावर आम्ही बोलू.
लक्ष्मण हाके हे अत्यंत निच पातळीवर जाऊन बोलतायत. त्यांचा उद्देश हा केवळ ओबीसी आणि मराठा समाजामध्ये भांडणं लावण्याचा आहे. पण मराठा समाज समजदार आहे. तो अशा फालतू बोलण्यामुळं कधीही गैरसमज करून घेणार नाही. आणि निश्चित पणानं जसे सलोख्याचे गावपातळीवर संबंध आहेत हे कायम टिकवून ठेवेल मराठा समाज याची मला खात्री आहे.
छगन भुजबळांच्या धमकीला आम्ही काही भीक घालत नाहीत, आम्ही 35 वर्षापासून राजकारण करतो, कोणी काय बोलायचं ते बोलू द्या त्याला उत्तरही देणार नाहीत, आमच्या कृतीतून आम्ही उत्तर देऊ. धमकी देणं हा त्यांचा प्रश्न आहे, हा प्रश्न त्यांनाच विचारला पाहिजे मी कधी कोणाला धमकी दिली का?, मी कोणाला काही वाईट बोललोय का? नाही. मी सर्व समाजाला बरोबर घेऊनच राजकारण करतोय आणि करणार. हाके हा सुपारी घेऊन काम करणार माणुस आहे, विधानसभेमध्ये त्याला सांगोला मतदारसंघामध्ये किती मतदान मिळालं 256 अशा माणसांबद्दल. तुम्ही त्याला मोठं करताय, मिडियाने त्याला मोठं करायचं सोडून द्याव.
दीपक बोराडे हा अत्यंत प्रमाणीक माणुस आहे. धनगर समाजाला धनगर समाजाच्या नेत्यांनी आजपर्यंत धनगर समाजाला देऊ म्हणून लढे केले. स्वत: मंत्रीपद घेतले आमदारक्या घेतल्या सगळं झालं, पण हा बोराडे अत्यंत प्रमाणीक माणुस आहे. शेवटी नेते जेव्हा गद्दारी करतात, तेव्हा समाजाला जागृत व्हाव लागतं असं म्हणत आमदार प्रकाश सोळंके यांनी जालन्यातील धनगर आरक्षण आंदोलनकर्ते दीपक बोराडे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.


Comments