छत्रपती संभाजीनगरात आढळल्या दोन बांगलादेशी महिलां बीडबायपासच्या हॉटेल व्हाइट हाऊसवर एटीएसचा छापा
- Navnath Yewale
- Jan 26
- 1 min read

छत्रपती संभाजीनगर: शहरातील बीड बायपासवरील व्हाइट हाऊस लॉजिंग अॅन्ड बोर्डिंगमध्ये दोन बांग्लादेशी महिला मिळून आल्या आहेत. दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ने हॉटेलमालकाविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिसांत बुधवारी (21 जानेवारी ) गुन्हा दाखल केला आहे.
दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) पोलिस निरिक्षक राजेश मयेकर यांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे. सोमवारी (19 जानेवारी) एटीएसला गोपनिय महिती मिळाली की, व्हाइट हाऊस लॉजिंग अॅन्ड बोर्डिंग येथे बांगलादेशी महिलांना थांबवून ठेवले आहे. पथकाने सायंकाळी 7:00 च्या सुमारास छापा मारला असता दोन बांगलादेशी महिला मिळून आल्या. त्यांची नावे शार्मिन गाजी मोफोजुल गाजी (वय 20), पॉली शेख मोहम्मद ओली शेख (वय 20) असल्याचे समोर आले. हॉटेलचालक आकाश नाना त्रिभूवन (वय 29 रा. आंबेडकरनगर, एन 7 सिडको ) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध बांगलादेशी महिलांची वास्तव्याची माहिती लपवून आश्रय दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरिक्षक भारत पाचोळे हे करीत आहेत.



Comments