top of page

छत्रपतींचा अवमान करणार्‍यांना टकमक टोकावरुन लोटावं पण...- मुख्यमंत्री फडणवीस


ree


छत्रपती शिवाजी महाराजांची 645 वी पुण्यतिथी व शिवारायांच्या समाधीच्या जिर्णोधारास 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रायगडावर आयोजित कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते. यावेळी उदयनराजे भोसले यांनी केलेल्या मागण्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यक्रामतच मान्य केल्या.


उदयनराजे म्हणाले की “छत्रपती शिवजी महारजांसह आपल्या महापुरुषांचा अपमान करणार्‍यांवर सरकारने कडक कारवाई करायला हवी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समग्र इतिहासाचं सरकारने प्रकाशन करावं” उदयनराजेच्या या मागण्या मुख्यमंत्रभ देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणातच मान्य केल्या

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, खासदार उदयनराजे भोसले यांनी आज ज्या मागण्या केल्या, त्यासंदर्भात आमंच (सरकारचं) त्यांच्याशी बोलणं झालं आहे. यावर आम्ही सविस्तर चर्चा केली आहे.


आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणार्‍यांवर आपण योग्य ती कारवाई करणार आहोत. यासह आमचं सर्वांचंच असं मत आहे की आपल्या महापुरुषांचा, छत्रपती शिवरायांचा अपमान करणार्‍याला टकमक टोकावरून लोटून दिलं पाहिजे. परंतु, आपण लोकशाही असलेल्या देशात राहतो. त्यामुळे अशा गुन्हेगारांवर लोकशाही अनुरूप कारवाई होईल. लोकशाही अनुरूप कठोर नियम करण्याचं आम्ही निश्चित केलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमाण इतिहास हा राज्य सरकारच्या वतीने तयार केला पाहिजे अशी मागणी देखील उदयनराजे भोसले यांनी केली आहे. आम्हालाही ती मागणी योग्य वाटते. राज्य सरकारच्या वतीने असा प्रमाण इतिहास तयार केला पाहिजे. आम्ही निश्चितपणे हे कामही लवकरच हाती घेऊ.

Comments


bottom of page