top of page

जंतर मंतरवर पुन्हा राडा; पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या

नवी दिल्ली#: कॉक्रोच जनता पार्टीच्या वतिने दिल्लीच्या जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनामध्ये सोमवार (दि.22) नंतर आज बुधवार (दि.22) पुन्हा राडा झाला आहे. आंदोलक आणि पोलिस पुन्हा आमने -सामने आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. तसेच जमावाला पांगवण्यासाठी आश्रुधूरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत.


केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून दिल्लीती जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर जंतरमंतर परिसरात पोलिसांचा मोठा फौफाटा तैनात करण्यात आला आहे. बुधवारी (दि.22) पुन्हा आंदोलक आणि पोलिस आमने-सामने आल्याचें पाहायला मिळालं. आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद झाला,त्यानंतर या ठिकाणी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला आहे. तसेच आश्रुधूराच्या नळकांड्या देखील फोडण्यात आल्याची माहिती असून जंतरमंतर परिसरात तणावाचे वातारण निर्माण झाले आहे.


सीजेपीच्या आंदोलकांनी सोमवारी (दि20) शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह इतर मागण्यांसाठी जंतरमंतर ते संसद असा मोर्चा काढला होता.या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. मोर्चा दरम्यान आंदोलक आणि पोलिस आमने -सामने आल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूरांचा मारा करण्यात आला होता. आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला होता . या घटनेत अनेक आंदोलक विद्यार्थी जखमी झाले होते. त्यानंतर संपूर्ण देशभरात वातावरण चांगलंच तापलं.


मोर्चा दरम्यान आंदोलन चिरडले जाणार असा कयास लावण्यात होता, मात्र सीजेपी प्रमुख अभिजीत दिपके यांनी मागण्यावर ठाम राहत आंदोलन सुरू ठेवले. मोर्चेकरी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठिचार्जमुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून विरोधी पक्षांनी अभिजीत दिपके यांच्या आदोलनाला पाठिंबा देत सरकारवर निशाणा साधला आहे. सोमवारच्या घटनेनंतर आज बुधवारी पुन्हा एकदा जंतरमंतरवर आंदोलक आणि पोलिस आमने -सामने आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला आहे, तसेच आश्रुधूरांच्या नकांडळ्या दखील फोडल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निमार्ण झाली. या आंदोलनास देशभरातून पाठिंबा वाढत आहे. दिल्लीत आंदोलन सुरूच आहे. मात्र आता विविध राज्यांमधील अनेक शहरांमध्ये देखील या आंदोलनाला पाठिंबा म्हणून विद्यार्थी आंदोलन करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Comments


bottom of page