जंतरमंतरवरील आंदोलनाच्या समर्थनार्थ निदर्शने
- Navnath Yewale
- 16 hours ago
- 4 min read

छत्रपती संभाजीनगर : दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देान वेगवेगळ्या ठिकाणी आदोलनं करण्यात आली. शहागंज येथील आंदोलनात विचारवंतांनी एकत्र येऊन सत्याग्रह आंदोलन केलं. त्यात शहरातील समाजसेवक, साहित्यिक, वकील यांच्यसासह विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांचे प्रश्न गंभीर असताना सरकार त्याकडे लक्ष देत नसल्यानं आंदोलन करण्याची वेळ आल्याचा आरोप करत चित्रपटात दाखवतात त्याप्रमोण सोनम वांगचुक यांचं अपहरण करण्यात आल्यानं सर्वासामान्यांच्या आदोलन करण्याच्या अधिकारावर गदा आणत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तर क्रांती चौक भागात विविध विद्यार्थी संघटनांनी एकत्र येऊन सरकार विरोधी घोषणाबाजी केली. या आंदोलनात मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपला रोष व्यक्त केला.
शहागंज येथे ज्येष्ठ विचारवंतांचे आंदोलन: शहरातील शहागंज येथील गांधी पुतळ्यासमोर ज्येषठ विचारवंत, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्यांनी सत्याग्रह आंदोलन पुकारलं. दिल्ली येथील विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय, युवक हा देशाचा कणा आहे आणि तोच मोडण्याचं काम केलं जात असल्याची टीका या आंदोलनातून विचारवंतांनी केली. आज या विद्यार्थ्यांवर जर अडचणी आहेत तर त्यांनी कोणाला सांगायच्या हा प्रश्न आहे. कारण त्याचं कोणीच ऐकून घेत नाही, ही शोकांतीका झाली आहे. बरेच दिवसांचा उद्रेक असा बाहेर पडायला सुरुवात झालीय, हळूहळू आंदेालन ठिकाणी गर्दी वाढत आहे, असं साहित्यिक अमर हबीब म्हणाले. तर विश्वगुरू पद विद्यार्थ्यांशिवाय कसं मिळू शकतं अशी टीका अभ्यासक तथा ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांनी केली.
जनरल डायर पाठवला: विरोधकांनी संसदेत हा विशय मांडला पाहिजे, सत्तेतील बेजबाबदारपणाव निघाला पाहिजे, लोकांनी देखील आवाज उभवण्याची गरज निर्माण झाली आहे. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वात जे आंदोलन आणिबाणीच्या आधी करण्यात आलं. तेव्हा लाखो लोक सभागी झाले होते, इंडिया गेट जवळ मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. मात्र त्यावेळी इतक्या मोठ्या सुरक्षा यंत्रणा लावण्यात आल्या नव्हत्या. त्यापेक्षाही मोठ्या संख्येनं आज यंत्रणा सक्रिय करण्यात आली. रस्त्यारस्त्यावर लोकांना अडवण्यासाठी अडथळे लावण्यात आले, आंदोलनाच्या ठिकाणी जाणार्या लोकांना तिकडे जाऊ नका माघारी फिरा अशा सूचना दिल्या जात आहेत. जसा जनरल डायर होता, त्याप्रमाणे एक नवीन पोलिस अधिकारी पाठवण्यात आल्याची टीका साहित्यिक अमर हबीब यांनी केली.
विद्यार्थी शिवाय विश्वगुरू कसे: जे पंतप्रधान स्वत:ला विश्वगुरू म्हणतात ते विद्यार्थ्याशिवाय विश्वगुरू कसे होऊ शकतात अशी टीका ज्येष्ठ पत्रकार तथा अभ्यासक जयदेव डोळे यांनी केली. विद्यार्थ्यांना प्रश्न अनेक आहेत. त्यामध्ये बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य अशा अनेक समस्या त्यांना आहेत, त्यात पालकांच्यवा समस्या असून वेगळ्या आहेत. पेपरफुटी होते, निकाल चुकीचे लागत आहेत अशात दाद कोणाकडे मागायची, जाब कोणाला विचारायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातून दबलेला आवाज बाहेर येण्यास गल्ली ते दिल्ली सुरुवात झाली आहे. सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाई म्हणाजे जबाबदारी झटकण्याचं काम सरकार करत असल्याचा आरोपही जयदेव डोळे यांनी केला.
क्रांती चौकात विद्यार्थी आक्रमक: शहराच्या मध्यभागी असलेल्या क्रांती चौकात विद्यार्थ्यांनी सकाळी 11:00 वाजता आंदोलनाला सुरुवात केली. जंतरमंतरवर विद्यार्थ्यांसाठी आंदोलन केलं जात आहे, शांतपणे सुरू असलेलं ओदालन सरकार चिरडू पाहत आहे. त्यामुळे सरकारला विद्यार्थ्यांचा आवाज ऐकायचा आहे का नाही, असा संतप्त प्रश्न उपस्थित करत आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.
बीड जिल्ह्यात ठिक ठिकाणी निदर्शने : दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनाच्या समर्थनार्थ बीड शहरातील विविध विद्यार्थी संघटनांसह विरोधी पक्षातील कार्यकर्ते पदाधिकार्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरेण आंदोलन केले. जंतरमंतरवरील शांततेत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर लाठीचार्ज करून सरकार पोलिसांचा वापर करत असल्याचा आरोप करत सरकार विद्यार्थ्यांना घाबरलं आहे. देशभरातून एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकरवी लाठीचार्ज करणं सरकारचं बिथरल्याचं लक्षण असून नीट पेपरफुटी प्रकरणात नैतिकता म्हणून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्याची मागणी यावेळी विद्यार्थी, पालकांसह उपस्थिती आंदोलकांनी केली. आंदोलकांच्या शिष्ठमंडळाने जिल्हाधिकार्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
परळीत निदर्शने: जंतरमंतरवरील आंदोलनाच्या समर्थनार्थ शहरातील विरोधी पक्ष, विविध संघटना विद्यार्थी, पालकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली,
सिरसाळ्यात धरणे: सिरसाळा (ता. परळी) येथे कॉकरोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आदोलनाच्या समर्थनार्थ धरणे आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांसह सामान्य नागरीकांनी आंदोलनात सहभाग नोंदवला.
अंबेजोगाकर रस्त्यावर: जंतरमंतरवरील आदोलनाच्या समर्थनार्थ अंबेजागाई (जि.बीड) येथील विरोधी पक्षांसह विविध संघटना, समाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी पालकांसह सामान्य नागरीकांनी आंदोलनात सभाग घेतला. रॅलीच्या माध्यमातून आक्रोश, घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या मांडला. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, सरकार विरोधात घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.

पाटोद्यात ढोल- ताश्यांच्या गजरात रॅली : केंद्र सरकारच्या कथित दडपशाहीविरोधात जोरदार निदर्शने: देशातील प्राख्यात वैज्ञानिक, शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, परीक्षेच्या प्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि शिक्षण व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कायम रहावा, या मागण्यांसाठी सुरू असलेल्या त्यांच्या आंदोलनाला देशभरातून समर्थन मिळत आहे. मात्र, लोशाही मार्गाने सुरू असलेलीया या आंदोलनाची केंद्र सरकारने गांभीर्याने दखल न घेता आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत पाटोदा तालुक्यातील विविध चळवळीतील सामाजीक कार्यकर्त्यांनी उपविभागीय कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. निदर्शनापूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून ढोल- ताशांच्या गरजरात भव्य रॅली काढण्यात आली.
यावेळी‘ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनाम द्या’ सोनम वांगचुक हम तुम्हारे साथ है, ‘ दडपशाही करणार्या केंद्र सरकारचा धिक्कार असो, प्रभू रामाच्या देणगीच्या अपहार करणार्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा” अशा घोषणांनी पाटोदा शहराचा परिसर दणाणून गेला. कॉम्रेड महादेव नागरगोजे,शिवभूषण दादा जाधव, अॅड. सय्यद वाहब, गणेश कवडे, अॅड. विशाल मस्के, दिलीप गाडे, मुकुंद शिंदे गणेश शेलार, दत्ता शिंदे आदींनी केंद्र सरकारच्या कथित लोकशाहीविरोधी भूमिकेवर सडकून टीका केली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्न उपस्थित करणार्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून केंद्र सरकार दडपशाहीचे धोरण अवलंबत असल्याचा अरोप यावेळी करणत आला. बहुजन, गरीब आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या समना संधीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील,” असा इशराही यावेळी देण्यात आला.

उपविभागीय अधिकारी श्रीमती शेख यांना आंदोलकांनी विविध मागण्यांचे निवदेन दिले.
भाई विष्णूपंत घोलप, पद्माकर बिनवडे, राहुल जाधव, सय्यद शफावोद्दीन, शेख इम्रान नुर, शेख इलियास, आबासाहेब भोसले, कॉ. भगवान पवळ, कॉ. भगवान पवळ, कॉ. भगवान जावळे, सुनिल काळे, पवन अडागळे आदी कार्यकर्ते, सामान्या नागरीक उपस्थित होते.



Comments