अभिजीत दिपके आंदोलनावर ठाम; जंतरमंतरवर पुन्हा आंदोलन सुरू
- Navnath Yewale
- 16 hours ago
- 1 min read

कॉकरोच जनता पार्टीचं दिल्लीच्या जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी भीषण लाठीचार्ज केला. जंतरमंतर ते संसद मोर्चादरम्यान आंदोलकांवर सुरक्षारक्षकांनी भीषण लाठीचार्ज केला. संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कॉकरोच जनता पार्टीचे आंदेालन आणि विरोधकांचा गदळारोळामुळे लोकसभेचे संसदीय कामकाज पाच वेळा तहकुब करावे लागलं.मोर्चा दरम्यान आंदोलनकर्त्यांनी संसदेकडे कूच करताच पोलिसांनी त्यांच्यावर भीषण लाठीमार केला.
त्यानंतर अश्रूधुराच्या नळाकांड्या फोडल्या. त्यामुळे आणखीच तणाव निर्माण झाला. यावेळी पोलिसांनी अनेकांची धरपकड केली. संध्याकाळपर्यंत जंतरमंतर मैदान खाली झालं. मात्र,अभिजीत दिपके यांनी केरळ हाऊस समोर धरेण आंदोलन करत पुन्हा जंतरमंतरवर जाऊन धरणे आंदोलन सुरू केलं आहे. जंतरमंतरवर अजूनही आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तो पर्यंत आम्ही मैदान सोडणार नाही, आंदोलकांनी असा ठाम निश्चय घेतल्याने वातावरण पुन्हा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जंतरमंतरवर शेकडो तरुण टॉर्च घेऊन ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलकांना सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी संबोधित केले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देईपर्यंत आम्ही जंतरमंतर सोडणार नाही. आम्ही येथे ठामपणे उभे आहोत आणि अधिक आंदोलक माच्यात सहभागी होण्याची वाट पाहत आहेत, असे सीजेपीचे प्रवक्ते अशुतोष रांका म्हणाले.
मैदानात येण्याचे आवाहन : अनेक लोक आसपास आहेत. सर्वांना आवाहन करतो तुम्ही सर्वांनी या ठिकाणी या. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आपल्याला मैदान सोडायचं नाही, असं रांका म्हणाले. आंदोलन सातत्याने चालू राहील हे स्पष्ट करत आंदोलक रात्रभर जंतरमंतरवर राहणार आहेत. त्यामुळे सकाळी ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Comments