top of page

दिल्लीतील लाठीचार्जने देशभरात संतापाटी लाट, प्रियंका गांधी आक्रमक !

नवी दिल्ली : कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीत आंदोलन पुकारले असून आज ‘ चलो संसद’ आंदोलनाचे आवाहन केले होते. या आंदोलनानंतर दिल्लीत लाखोंच्या संख्येने विद्यार्थी जमले असून ते संसदेच्या दिशेने निघाले असता, या नियोजीत मोर्चाला सरकाने पोलीस बळाचा वापर करून चिरडण्याचा प्रयत्न केल्याचे आता समोर आले आहे. येथे पोलिसांनी एकीकडे सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतले, तर दुसरीकडे आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला आहे.


आता या घटनेचे व्हिडिओ समोर येत असून एका आंदोलक विद्यार्थ्यावर लाठी चालवल्याचे समोर आले आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचाही आक्रमक पवित्रा समोर आला असून “ तो मारा..संपवा ” असे म्हणत आहे. तर या सर्व घडामोडींवर काँग्रेस नेत्या तथा खासदार प्रियंका गांधी यांनी संतापव्यक्त करत, “ आपली मुलं आहेत, त्यांच्यावर लाठीचार्ज कशाला?” असा सवाल सरकारला केला आहे.


दिल्लीत सुरु असलेले कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन तीव्र झाले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. या मागणीसाठी आंदोलन सुरूच राही अशी आक्रमक भूमिका सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी घेतली आहे. तर हे आंदोलन चिरडण्यासाठी केंद्र सरकार दबाव वाढवत असल्याचा अरोप करण्यात आला आहे.

आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचर्जा केल्याने परिस्थिती अधिकच तणापूर्ण बनली आहे. या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी अभिजीत दिपके यांना ताब्यात घेण्यात आले होते. तर जंतर मंतर येथे लाठीचार्ज करत आंदोलकांना ताब्यात घेतले जात होते.


कित्तेक आंदोलकांचे व्हिडीओ आता समोर येत आहेत, एका आंदोलनकर्त्याला पाच ते आठ पोलिस रिंगन करून जबर लाठीचार्ज करत आहेत, एका आंदोलनकर्त्याच्या डोक्यातून मोठा रक्तश्राव होत आहे, तर सोळा वर्षाच्या शाळकरी मुलींवरही लाठीचार्ज झाल्याने त्या माध्यमांसमोर एका वरिष्ठ महिला पोलिस अधिकार्‍याला जाब विचारत आहेत. शिवाय, आंदोलकांवर प्रथमोपचार करण्यासाठी आलेल्या महिला व पुरुष डॉक्टरांवरही लाठीचार्ज करण्यात आलाय, आम्ही डॉक्टर आहोत असं सांगितल्या नंतरही ‘ तुम्हे किसणे बुलाया’ म्हणत लाठीचार्ज केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.


दरम्यान, आंदोलनामध्ये सहभागी मुलींचे कपडे फाडले, त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला, याहीपलिकडे पुरूष पोलिस कर्मचार्‍याने विद्यार्थ्यानीचे कपडे फाडून तिच्यावर लाठीचार्ज करत लाथाने मारहाण केल्याचा आरोपही अभिजत दिपके यांनी केला. आंदोलनकर्त्यावर लाठीचार्ज च्या नावाखाली सुरक्षारक्षकाच्या वेषात गुंडांनी क्रूरतेचा कळस गाठल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.


या सर्व घडामोडीनंतर आता दिल्लीत राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विरोधकांकडून मोदी सरकारवर टीका होत आहे. याच मुद्यावरून काँग्रेस नेत्या तथा खासदार प्रियंका गांधी चांगल्याच संतापल्या. त्यांनी या लाठीचार्जवरून सरकारला खडे बोल सुनावले आहेत. तसेच “ आपली मुलं आहेत, त्यांच्यावर लाठीचार्ज कशाला?” असा सवालही उपस्थित केला आहे.

एकीकडे सर्वजण सरकारला चर्चा करा, असे म्हणत आहेत. आपल्या शिक्षण व्यवस्थेत काही त्रुटी असून इतरही काही अडचणी आहेत. मात्र सरकार यावर बोलायला आणि चर्चा करायला तयार नाही.उलट विद्यार्थ्यांवर अश्रुधुराचा मारा आणि लाठीचार्ज केला असे प्रश्न उपस्थित करत खासदार प्रियंका गांधी यांनी संताप व्यक्त केला.

bottom of page