top of page

जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

ree

जगदीप धनखड उपराष्ट्रपतीपदाचा आज (21 जूलै)राजीनामा दिला आहे. प्रकृती अस्वास्थाचे कारण देत, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पदाचा राजीनामा सादर केला आहे.


संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जगदीप धनखड यांनी राजीनामा सादर केला आहे . राष्ट्रपतींना उद्देशून लिहिलेल्या पत्रात जगदीप धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. त्याच पत्रात त्यांनी संविधानाच्या कलम 67 (अ) चा हवाला देऊन राजीनामा देण्याची घोषणा केली. भाजप प्रणित एनडीएचे उमेदवार असलेले जगदीप धनखड हे भारताच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय झाले होते. काँग्रेससह इतर विरोधकांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा त्यांनी पराभव केला होता. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्याकडे पदाचा राजीनामा सादर केला आहे.

Comments


bottom of page