top of page

जम्मू-काश्मीरच्या शोपिया मध्ये पहलगाम हल्ल्यातील तीन दहशतवादी ठार

भारतीय सुरक्षादलाची कारवाई; दहशतवादी एलएटी या दहशवादी संघटनेशी संलग्न



ree


पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी भारतीय लष्कराकडून जम्मू काश्मीरमध्ये शोध मोहिम राबवण्यात येत आहे. दरम्यान, ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर शस्त्रबंदी घोषणा करण्यात आली असली तरी, भारतीय लष्कराकडून सुरक्षेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यासाठी जम्मु काश्मीरमध्ये सुरक्षदलाची शोधमोहिम सुरू आहे. आज सकाळी सुरक्षदलास शोपिया परिसरात तीन आतंकवादी दडल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहिती नुसार सुरक्षादलांच्या जवानांनी शोपिया परिसरतील जंगलात शोध मोहिम सुरू केली. यामध्ये तीनही आतिरेकी लपलेल्या ठिकाणाला सुरक्षादलाच्या जवानांनी वेढा घातला.


दरम्यान, अतिरेक्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला.यामध्ये जवनांनी एका अतिरेक्याचा खात्मा केला. उर्वरित दोन अतिरेकी आणि सुरक्षादलाच्या जवानांमध्ये तब्बल दिड तास फायरींग सुरू होती. अखेर दिड तासाच्या चकमकीनंतर सुरक्षदलाच्या जवानांनी उर्वरित दोन्ही अतिरेक्यांना कंठस्नान घातले. सुरक्षादलाच्या जवानांनी पहलगाम दहशवादी हल्ल्यातील तीन अतिरेक्यांचा आज खात्मा केला आहे. सोमवारी (11 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्ही आतंवाद्यांना दिसतील तिथे मारू असे ठणकावल्या नंतर अवघ्या काही तासांतच सुरक्षादलाच्या जवानांनी पहलगाम हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांचा खात्मा केल्याने ही कारवाई महत्वाची मानली जात आहे.

댓글


bottom of page