जरांगे पाटलांचा मुंबई आंदोलनाचा ‘रोड मॅप’ ठरला ! आंतरवालीत उद्या प्रमुखांची बैठक; उपस्थित राहण्याचे आवाहन

आंतरवाली: सरकारच्या शिष्टमंडळाशी वारंवार चर्चा निष्फळ ठरल्याने जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलनाचा ईशारा दिला आहे. जरांगे पाटील यांनी 12 सप्टेंबर पर्यंत सरकारला अल्टीमेट दिला. मागण्यांवर ठाम जरांगे पाटीलांनी आता मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर उद्या राज्यातील प्रमुखांची आंतरवाली सराटीमध्ये बैठक बोलावली असून मुंबई आंदोलनावर जरांगे पाटील ठाम आहेत.
मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी जरांगे पाटील यांचे गेल्या 14 दिवसांपासून अंतरवाली येथे बेमुदत उपोषण सुरू आहे. शुक्रवार (दि.11) जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा 14 वा दिवस, प्रकृती खालावल्याने जरांगे पाटीलयांनी उपचारास संमती दिली. मागण्यांसाठी जरांगे पाटलांनी सरकारला दि. 12 सप्टेंबरचा अल्टीमेट देत थेट मुंबईत आंदोलनाचा ईशारा दिला. सरकारकडून वारंवार शिष्टमंडळ पाठवण्यात आले. मात्र शिष्टमंडळाशी चर्चा निष्फळ झाल्यानंतर जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला.
मराठा आरक्षणाबाबत सरकार चालढकल करीत आहे, एकूण 15 मागण्यांपैकी काही मागण्या माण्य करण्यात आल्या असल्या तरी प्रत्यक्ष कृती काहीच नसल्याचा आरोपही जरांगे पाटील यांनी केला. मागण्यांवर ठाम जरांगे पाटील यांनी मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर उद्या राज्यातील प्रमुखांची बैठक बोलावली आहे. जरांगे पाटील यांनी शुक्रवारी (दि.11) पत्रकार परिषदेत मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर माहिती दिली. जरांगे पाटील म्हणाले, पावसाअभावी पीके करपून गेली आहेत, सध्या संकटाचे दिवस आहेत. मुंबईला येणार्या आंदोलकांना गावपातळीवर वर्गणी करून वाहन, जेवना चरा खर्च ज्या त्या ग्रामस्थांनी करावा.
छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे हिंदूच्या सणाला विघ्न आणणार नाहीत या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर जरांगे पाटील म्हणाले, आम्ही छत्रपतींच्या हिंदुत्वाला माणणारे आहोत, आम्ही हिंदू आहोत. एकत्रीत येण्यासाठीच सण, उत्सव असतात. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी अन्यायाच्या विरुद्ध एकत्रीत लढा देण्यासाठीच गणेशोत्सवाची स्थापना केली. आमच्याकडून सणामध्ये कुठलंही विघ्न येणार नाही, मात्र सरकारने आमच्यासाठी विघ्न बनवू नये, अशी उपरोधक टिकाही जरांगे पाटील यांनी केली.
संकटाचे दिवसमान असल्याने ज्यांना शक्य होईल त्यांनी मुंबईला यावं ज्यांना शक्य नाही त्यांनी किमान आम्ही ज्याव मार्गाने जाणार आहोत त्या मार्गावर आम्हाला आशिर्वाद देण्यासाठी उपस्थित राहावं. मुंबईत आम्हाला त्रास झाला तर शांततेच्या मार्गाने गाव, तालुका, जिल्ह्यात रस्त्यावर उतरून ठिय्या मांडावा. मुंबईला जायचं की नाही हे उद्याच्या बैठकीत ठरणार आहे. सणा-सूदीचे दिवस असल्याने मुुंबईला येण्याचं महिलांनी आपल्या स्तरावर ठरवावं. राज्यातील प्रमुखांनी उद्या अंतरवालीत बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे अवाहन जरांगे पाटील यांनी केले.



Comments