जरांगे पाटलांचा सरकारला अल्टीमेट !
- Navnath Yewale
- Aug 30
- 2 min read
मरण आलं तरी पत्कारेन, पण माघार नाहीच

मुंबई: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हजारो समाज बांधवांसह 29 ऑगस्ट पासून आझाद मैदान (मुंबई) येथे उपोषण सुरू केले आहे. आज आंदोलनाचा दुसर्या दिवशी जरांगे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल करत एक दिवसाचा अल्टीमेट दिला आहे.
राज्यातील मराठा समाजास सरसकट ओबीसीतून (कुणबी) आरक्षण देण्याच्या मागणीसाठी शुक्रवार 29 ऑगस्ट पासून आझाद मैदानामध्ये उपोषण सुरू केले आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये लाखो मराठा बांधव सहभागी आहेत. जरांगे पाटील यांना रोखण्यासाठी सरकारस्तरावरून प्रयत्न करण्यात आले. गणेशोत्सवामुळे मुंबईत होणारी गर्दी आणि जरांगे पाटील यांचे आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून जरांगे पाटील यांना रोखण्याच्या वेगवेगळ्या कृल्प्या अवलंबण्यात आल्या. मात्र मागण्यावर ठाम जरांगे पाटील लाखो आंदोलकांसह आझाद मैदानावर दाखल झाले आणि आंदोलनालाही सुरुवात केली.
जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे आझाद मैदानासह सीएसएमटी, मंत्रालय, मरिन ड्राईव्ह, गेट वे ऑफ इंडिया, व्हिटीसह उपनगरातील रस्त्यांवर जाम झाला आहे. शुक्रवारी आंदोलकांनी मुंबईसह उपनगरातील रस्त्यांवर ताबा मिळवत धरणे सुरू केल्याने सर्वत्र वाहतूक ठप्प झाली. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना मोठ्या वाहतुक कोंडीला सामोरं जावं लागलं. गैरसोय होवून आंदोलक माघारी फिरावेत आणि त्यातूनच आंदोलनाची तीव्रता कमी या उद्देशाने सरकारने खाऊ गल्ली सह परिसरातील नाष्टा, चहा, पाणी विक्रेत्यांची दुकाने बंद ठेवल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला.
या शिवाय पनवेल, वाशी मार्गे आझाद मैदानाकडे येणार्या आंदोलकांची वाहने पोलिसांनी आडवली तर काही वाहनांना चूकीच्या मार्गाने धाडल्याचा आरोपही आंदोलकांकडून करण्यात आला. त्यामुळे मुंबईत घुसताच आंदोलकांना शहरातील रस्त्यांवर ताबा मिळवला. त्यामुळे शुक्रवारी दिवभर आणि शनिवारी दूपार पर्यंत मुंबईसह बहुतांश उपनगरातील वाहतुक ठप्प राहिली.
जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेद्वारे सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आंदोलकांना त्रास होईल असं जानिवपूर्वक सरकार वागत आहे. फडणवीस सरकार मराठ्यांचा अंत पाहू नका, आमच्या हक्काचं आम्हाला द्या. आमच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे तो ओबीसी आरक्षणासाठी आधार आहे. हैदराबाद संस्थान, सातारा संस्थान, बॉम्बे गव्हरमेंटचं गॅझेट लागू करून राज्यातील सरसकट मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र वाटप करा या मागण्यांसह जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर आरोप करत टीका केली.
आंदोलनाची घटीका जवळ आल्यानंतर ऐनवेळी एका दिवसात नियम (कायदा) करायचा आणि आंदोलन दडपायचं, आम्ही कायदेशीर प्रक्रिया पार पाडली आहे. लोकशाही मार्गाने कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन सुरू केले आहे. आम्हाला आता परवानगी वाढून मिळावी असे अवाहन करत सरकारला आणखी एक दिवसाची मुदत देतो. तात्काळ मागण्यांची आंमलबजावणी करा असंही जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
शिंदे समिती जरांगे पाटील यांच्या भेटीला
जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार राज्यातील मराठा समाजास ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर आज मा.न्यायाधीश संदिप शिंदे यांनी आंदोलनस्थळी जरांगे पाटील यांची भेट घेवून चर्चा केली. जरांगे पाटील यांच्या हैदराबाद गॅझेट संदर्भात चर्चा करताना जरांगे पाटील म्हणाले की, हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट, बॉम्बे गव्हरमेंटचं गॅझेट लागू केल्याशिवाय मी माघार घेणार नाही.
त्यासाठी शिंदे समितीने सहा महिण्याचा कालावधी मागितला. जरांगे पाटील यांच्याशी चर्चेनंतर शिंदे समिती मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेवून दिड तास चर्चा केल्याची माहिती आहे.
खासदार, आमदारांची चढाओढ
भाजप आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी (अ.प.) चे आमदार प्रकाश सोळंके, आमदार विजयसिंह पंडीत, आमदार राजेश विटेकर राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) आमदार संदीप क्षीरसागर, आमदार अभिजीत पाटील, खासदार बजरंग सोनवणे, खासदार भगरे गुरुजी, खासदार निलेश लंके शिवसेना (शिंदे) आमदार हिकमत उडाण शिवसेना (ठाकरे) आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार नागेश पाटील आष्टीकर काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत यांनी यांनीही मनोज जरांगे पाटील यांची —भेट घेवून आंदोलनाला पाठींबा जाहिर केला आहे.



Comments