top of page

जरांगे पाटलांची प्रकृती खालवली, सरकारचे शिष्ठमंडळ संभाजीनगरमध्ये दाखल

जलना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवाली येथे शनिवार (दि.29 ऑगस्ट) पासून बेमुदत उपोषण सुरू आहे. मंगळवार (दि.1) आंदोलनाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली. सकाळी डॉक्टरांचे पथक तपासणीसाठी आले असता, त्यांची शुगर लेवल कमी झाल्याने उलट्यांचा त्रास झाला. आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवल्याचे पडसाद राज्यभरात उमटले. सायंकाळी उशिरा सरकारचे शिष्ठमंडळ छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल झाले असून लवरच मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचे मराठा आरक्षणद उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यावेळी म्हणाले.


मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील याचे आंतरवाली (ता. आंबड) येथे बेमुदत उपोषण सुरू आहे. शनिवारी (दि.1) आंदोलनाच्या चौथ्या दिवशी जरांगे पाटील यांची प्रकृती खालवल्याने राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाजाकडून निदर्शने करण्यात आली. जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर सरकारने तात्काळ मार्ग काढण्याची मागणी आंदोलनकांनी केली. राज्यभरातून मराठा बांधव आंतरवालीच्या दिशेने मार्गक्रम करत असून आंदोलनस्थळी गर्दी वाढत आहे.


कालच जरांगे पाटील यांनी समाजबांधवांना मुंबईकडे निघण्याची घोषणा केल्याने समर्थकांमध्ये उत्साह निर्माण झाला. सर्वांनी एकत्र जाणे शक्य नसल्याने सोईनुसार 12 सप्टेंबर पर्यंत मुंबईत पाहोचण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. शनिवारी (दि.1) सकाळी डॉक्टरांचे पथक तपासणीसाठी आले असता शुगर लेवल कमी झाल्याने त्यांना उलट्यांचा त्रास होवू लागला. प्रकृती खालवल्याने जरांगे पाटील यांनी तपासणीस विरोध केला. दरम्यान आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी शासकिय डॉक्टरांच्या पथकाने तपाणी केली असता त्यांची शुगर लेवल वाढल्याचा रिपोर्ट आला. त्यामुळे संतप्त होवून जरांगे पाटील यांनी तपासणीस विरोध केला होता.


आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी पासून सरकारच्या शिष्ठमंडळाची प्रतिक्षा असताना सरकारकडून कसलाही संपर्क झाला नाही,मुंबईची तयारी करण्याचे आवाहन करत त्यांनी तुम्ही सोईनुसार मुंबईकडे निघण्याचे अवाहन केले. मनोज जरांगे यांची प्रकृती खालवली असतानाच सायंकाळी उशीरा सरकारचे शिष्ठमंडळ छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल झाले. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.


आंतरवालीकडे चर्चेसाठी जाणार का? या प्रश्नावर मंत्री विखे पाटील म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांना सरकारने घेतलेल्या निर्णयाचा चार्ट पाठवला आहे, त्यावर त्यांच्याकडून सकारात्मक निर्णय येईल अशी अपेक्षा आहे. जरांगे पाटील यांच्या मागण्यांसदर्भात विभागातील अधिकार्‍यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सरकारने दिलेल्या निर्देशावर सविस्त चर्चा करण्यात येणार आहे. जरांगे पाटील यांना सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबतचा सविस्तर अहवाल पाठवला असून त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद येईल असंही मंत्री विखे पाटील म्हणाले.

Comments


bottom of page