top of page

जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली, उपचारार्थ थेट रुग्णालयात दाखल; उद्याच्या दसरा मेळाव्या बाबात मोठी माहिती.

ree

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायणगड येथे दसरा मेळावा पार पडणार आहे, मात्र, दसरा मेळाव्या पूर्वीच आज मनोज जरांगे पाटील यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.


श्री क्षेत्र नारायण गडावर मनोज जरांगे पाटील यांचा उद्या दसरा मेळावा पार पडणार आहे. अतिवृष्टीमुळे यंदा साध्या पद्धतीने दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे गडाचे महंत शिवाजी बाबा महाराज यांच्यासह मनोज जरांगे पाटील यांनी जाहिर केले असले तरी मेळाव्याची पूर्ण तयारी करण्यात आली आहे.


मेळाव्यासाठी येणार्‍या भाविकांनी गडा ऐवजी पूरग्रस्तांसाठी देणगी स्वरुपात मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र मेळाव्या पूर्वीच मनोज जरांगे पाटील यांना व्हायरल तापाचा त्रास होवू लागल्याने त्यांना उपचारार्थ छत्रपती संभाजीनगगरच्या एका रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं आहे.


मराठा समाजास ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदानामध्ये उपोषण केले होते. जरांगे पाटील यांच्या एकून मागण्या पैकी सहा मागण्या मान्य करण्यात आल्या. यापैकीच एक हैदराबाद गॅझेटिरच्या मागणी नुसार सरकारने जीआर काढला. हैदराबाद गॅझेटिअर, सातारा गॅझेटिअर च्या अंमलबजावणीने मनोज जरांगे पाटील यांच्या आदोलनाला मोठं यश मिळालं आहे.


राज्यात हैदराबाद गॅझेटिअर लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच श्री क्षेत्र नारायण गडावर दसरा मेळावा पार पडत आहे. त्यामुळे या मेळाव्यात जरांगे पाटील काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र आज त्यांची अचानक तब्येत बिघडली आहे. त्यामुळे ते उद्याच्या दसरा मेळाव्याला हजर राहणार की नाही ? असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच जरांगे पाटील यांनी स्वत: स्पष्ट केलं आहे. ते उद्याच्या दसरा मेळाव्याला श्री क्षेत्र नारायण गड येथे जाण्यावर ठाम आहेत. अ‍ॅब्युलन्समधून जाणार मात्र दसरा मेळाव्याची परंपरा मोडणार नसल्याचं त्यांनी म्हटलं.

Comments


bottom of page