top of page

जरांगे पाटलांची सरकार आणि अधिकार्‍यांवर तीव्र नाराजी, मराठा समाजास आवाहन

ree

जालना: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देण्याच्या दिरंगाईवरून सरकार आणि अधिकार्‍यांवर तीव्र नाराजी क्यक्त केली आहे. गेल्या साडेतीन महिन्यांत केवळ 98 मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली आहेत. तर या कालावधीत 594 अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी सर्वाधिक 445 अर्ज एकट्या परभणी जिल्ह्यातून आले होते, परंतु मंजूर प्रमाणपत्रांची संख्या अत्यंत कमी आहे. जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी आणि विखे पाटील यांनी काढलेला जीआर तातडीने लागू करून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे द्यावीत, अशी मागणी केली आहे. सरकार आणि अधिकारी जाणूबुजून ही प्रक्रिया थांबवत असल्याचा अरोप त्यांनी केला आहे.


शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी असूनही प्रमाणपत्रे दिली जात नाहीत, तसेच ज्यांना प्रमाणपत दिली जात आहेत त्यांच्या कुटुंबीयांनाही ती मिळत नाहीत, असे जरांगे पाटील यांनी निदर्शनास आणले. हैदराबाद गॅझेटियरनुसार काढलेला जीआर मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना तातडीने लागू करण्याची मागणी आहे.

Comments


bottom of page