पोलिस अधिकारी लांबा, शर्मा निलंबनासाठी ‘कॉक्रोच’ चा सरकारला अल्टिमेटम!; जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलकांवर खुनाच्या प्रयत्नासह 13 कलमांखाली गंभीर गुन्हे
- Navnath Yewale
- 2 hours ago
- 1 min read

नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणावरून दिल्लीत झालेल्या विद्यर्थी आंदोलनानंतर निर्माण झालेला वाद अद्यापही कायम आहे. या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जवरून कॉक्रोच जनता पक्षाच्या उपहासात्मक आंदोलनाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप करत संबंधित अधिकार्यांवर करावाईची मागणी कली आहे.
संसदेवर काढण्यात आलेल्या विद्यार्थी मोर्चादरम्यान दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला होता. या घटनेत विशेषत: महिला आंदोलकांना त्रास झाल्याचा दावाही करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अभिजीत दिपके यांनी दिल्ली पोलिसांचे डीसीपी संदीप लांबा, एसीपी अजय शर्मा आणि सचिन शर्मा यांच्यावर कारवाई करून त्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.
धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप असलेल्या पोलिस अधिकार्यांबाबतही कारवाई व्हावी, अशी भूमिका दिपके यांनी मांडली.
दरम्यान, दिपके यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात संबंधित पोलिस अधिकार्यांवर टीका करत, “ आंदोलनादरम्यावन आम्हाला धमकावण्यात आले. संबंधित अधिकार्यांवर कारवाई होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही,” असे म्हटले आहे. तसेच त्यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या जेन-झी विद्यार्थ्यांच्या धैर्याचे कौतुक करत आंदोलनाच्या यशाचे श्रेय आंदोलकांना दिले.
आंदोलकांवर 13 कलमांखाली गुन्हे : आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी विद्यार्थी आंदोलकांविरोधात गुन्हादाखल केला आहे. पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नासह भारतीय न्याय (बीएनएस) विविध 13 कलमाखाली गुन्हे नोंदवले आहेत.
एफआयआरमध्ये काय म्हटले: दिल्ली पोलिसांच्या एफआयआरनुसार, आंदोलकांनी संसदेच्या उच्च सुरक्षा क्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत सुरक्षा बॅरिकेट तोडण्याचा प्रयत्न केला तसेच पोलिसांवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका पोलिस निरीक्षकाच्या तक्रारीवरून कर्तव्य पथ पोलिस ठराण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलकांकडून पोलिसांच्या कारवाईवरप प्रश्न उपस्थित करण्यात येत असताना, दिल्ली पोलिसांनी मात्र कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती कारवाई केल्याचे आपवल्या एफआयआरमध्ये नमूद केले आहे.



Comments