जरांगे पाटलांच्या निर्णायक बैठकीकडे राज्याचे लक्ष—!
- Navnath Yewale
- Aug 23
- 1 min read

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्ट मुंबई आंदोलनावर ठाम आहेत. मराठा आरक्षण अंमलबजावणीसाठी सरकारला चार महिन्याचा वेळ दिला आता वेळ नसतो, कोट्यावधी मराठे मुंबईत घुसणार आहेत. सरकारला शेवटचा इशारा आणि मराठ्यांसाठी शेवटची निर्णायक बैठक 24 ऑगस्ट रोजी बीडच्या मांजरसुंबा येथे आयोजीत केली आहे. या बैठकीतून मनोज जरांगे पाटील काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठा आरक्षण मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबई, अझाद मैदानमध्ये आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्यभर दौरे केल्या नंतर मराठा समाजबांधवांकडून मुंबई आंदोलनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमिवर जरांगे पाटील यांनी सरकारला शेवटचा इशारा व मराठा समाजासाठी शेवटीची निर्णायक बैठक म्हणून रविवारी (24 ऑगस्ट) बीड च्या मांजरसुंबा येथे इशारा बैठकीस संबोधीत करणार आहेत. दरम्यान , मराठा समाजाच्या कुणबी नोंदी अढळल्या आहेत. मराठा आरक्षणासाठी सरकारला अपेक्षीत असलेला नोंदीचा पुरावा पुरेसा आहे.
दोन वर्षापासून सातत्याने सरकारला वेळ दिला आहे. तीन वर्ष चालेलं देशातल नाही तर जगातलं पहिलं आंदोलन मराठ्यांचं आहे. सरकारने तात्काळ मागण्यांचा विचार करून आंमलबजावणी करावी अन्यथा 27 ऑगस्ट रोजी मराठे आंतरवालीतून मुंबईकडे कूच करणार, आणि तो आरक्षण घेतल्या शिवाय परत फिरणार नाही असा निर्णायक इशारा त्यांनी दिला आहे.
राज्यभरातील मराठा समाजबांधवांकडून मुंबई आंदोलनाची जय्यत तयारी करण्यात आली असून मांजरसुंबा येथे संपन्न होत असलेल्या निर्णायक बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीस राज्यभरातील सकल मराठा स्वयंसेवक, समन्वयकांसह पंचक्रोशीतील समाज बांधव उपस्थित राहणार आहेत.



Comments