top of page

जरांगे पाटलांच्या मुंबई आंदोलनाचा धसका; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय!

मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ विशेष उपसमिती गठीत; मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील नवे अध्यक्ष


ree

मुंबई: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई छेडली आहे. यासाठी त्यांनी येत्या 29 ऑगस्टला मुंबईतील आझाद मैदानावरली आंदोलनात सहभागी होण्याचं अवाहन केलं आहे. जरांगेच्या या आंदोलनासाठी राज्यभरातील मराठा बांधव मोठ्या संख्येनं 29 ऑगस्टला मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई महापालिका, पोलिस प्रशासन यांच्यावर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. याच आंदोलनाचा धसका घेत सरकानं धावाधाव सुरू केली आहे. यातच आता फडणवीस सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत शुक्रवारी (ता.22) तातडीनं बैठक बोलावली. या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही नेते उपस्थित होते. या बैठकीत मराठा आरक्षणाविषयक विशेष उपसमितीच्या अध्यक्षपदी मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांच्याजागी उपसमितीच्या अध्यक्षपदी विखे पाटील यांची निवड करण्यात आली आहे.


राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे विखे नवे अध्यक्ष असणार आहे. यापूर्वी एकनाथ शिंदे सरकारच्या काळात, तत्कालीन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे 4 ऑक्टोबर 2022 रोजी स्थापन झालेल्या मराठा आरक्षणविषयक राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष होते. पाटील यांच्या जागाी आता विखे-पाटील यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.

राज्य सरकारने मराठा समाजाची सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि इतर विषयांवर शिफारसी करण्यासाठी कॅबिनेट उपसमितीची पुनर्रचना केली आहे. या कॅबिनेट उपसमितीत एकूण 11 कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे.


राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडून याबाबतचा सरकारी आदेश जारी करण्यात आला आहे. या उपसमितीकडे मराठा आरक्षणासाठी प्रशासकीय आणि कायदेविषयक कामांचा समन्वय साधण्याची जाबाबदारी देण्यात आली आहे. तसेच, ही मंत्रिमंडळ उपसमिती मराठा आंदोलक आणि त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्याचं कामही पार पाडणार आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची कार्यपद्धती ठरवण्याचा अधिकारही या उपसमितीला देण्यात आले आहेत.

Comments


bottom of page