जरांगे पाटलांना म्हणावं, ओबीसीमधील 374 जाती... आमदार वडेट्टीवारांचा संताप
- Navnath Yewale
- Oct 5
- 1 min read

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि.3) साह्याद्री आतिथीगृहावर ओबीसी नेत्यांची पार पडली. या बैठकीत ओबीसी नेत्यांनी हैदराबाद गॅझेटिअरच्या जीआरसह जात प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली. मंत्री छगन भुजबळ हे चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. ओबीसी आरक्षण बचासाठी 10 ऑक्टोबरच्या मोर्चावर ठाम असल्या सांगत कॉग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी जरांगे पाटील यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.
ओबीसी नेत्यांच्या बैठकीनंतर विजय वडेट्टीवर यांनी माध्यमांशी संवाद साधत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली नाही. बैठकीमध्ये मी हैदराबाद गॅझेटिअरचा जीआर रद्द करण्याची मागणी केली. शिवाय मंत्री पंकजा मुंडे यांनी वाटप करण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली. सरकारने हैदराबाद गॅझेटिअरचा जीआर रद्द करून त्यांचा प्रतिनिधी मोर्चात पाठवावा आम्ही त्यांचे स्वागत करू असं वडेट्टीवार काल माध्यमांशी बोलताना म्हणाले.
त्यावर जरांगे पाटील यांचीही प्रतिक्रिया समोर आली. मुख्यमंत्र्यांना माहित आहे मराठ्यांचा महसूली दस्तऐवज आहे. हैदराबाद गॅझेटिअरसह सातारा, औंध, कोल्हापूर, बाँम्बे गव्हरमेंटचं गॅझेट हे महसूली पुरावा असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आले आहे. जीआर रद्द करायला काय बापाची पेंड आहे का? जीआर रद्द होत नसतो, मराठा समाजाला दिवळीपूर्वी जात प्रमाणपत्र मिळत असतात. मुख्यमंत्री फडणवीस यांनी येवल्यावाल्याच्या (भुजबळ) च्या नादाला लागून काही निर्णय घेवू नये आमची त्यांना विनंती आहे. अन्यथा खूप अवघड होईल असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.
यावर आता विजय वडेट्टीवर यांनी आज माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांच्यावर संताप व्यक्त केला. वडेट्टीवार म्हणाले की,जरांगे पाटलांना सांगून टाका, 374 जातींच्या लोकांना समुद्रात बुडवून टाक तुझ्या ताकदीच्या भरवश्यावर, मारुन टाक म्हणा, संपवून टाक म्हणा सगळ्यांना, गळा घोटून मारा, आता बारा लोकांनी आत्महत्या केल्यात ओबीसीच्या. ती जी काय दादागिरी, ती जी काय सत्ता, आणि जनेतेच्या मराठा समाजाच्या ताकदीच्या भरवश्यावर, समाज मोठा म्हणून जर आम्हाला धमकावत असेल, तर घाल म्हणा घे बंदूका, तलवारी आणि छाटा मान आमच्या म्हणजे समाधान होईल त्याला. असंही वडेट्टीवर म्हणाले.



Comments