top of page

जरांगे पाटलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; आंतरवालीत महिलांकडून औक्षण जिवंत आहे तोपर्यंत मराठा आणि अंतरवालीची नाळ तुटू देणार नाही - जरांगे पाटील

1 hour ago
2 min read

जालना: मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी पाटोदा येथे सरकारच्या शिष्टमंडळाच्या अश्वासानानंतर जरांगे पाटील यांनी आंदोलन सथगिती केले. प्रकृती खालवल्याने जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रदिर्घ उपचारा नंतर जरांगे पाटील यांना आज मंगळवारी (दि.29) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. जरांगे पाटील रुग्णालयातून थेट आंतरवाली सराटीत दाखल झाले. अचानक गावात आलेल्या जरांगे पाटील यांचे ग्रामस्थ , महिलांनी औक्षण करत जोरदार स्वागत केले.


मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना उपचारानंतर आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीमध्ये आंदोलनापूर्वीच हे निर्णायक आणि शेवटचे आंदोलन असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरू असतानाच रविवारी (दि. 27) आंतरवाली सराटी येथील आंदोलनस्थळावरील मंडप, स्टेज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्यात आला. आंतरवाली सराटीमधील आंदोलन स्थळावरील मंडप, स्टेज हटवल्याने चर्चाचे पेव फूटले.


आंतरवाली सराटीमध्ये ग्रामसभेत मोठा गदारोळ होण्याच्या शक्यतेमुळे आंदोलनास्थळावरील मंडप, स्टेज आणि पुतळा हटल्याचे आरोपही करण्यात आले. प्रत्यक्षात जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणारांमध्ये आंतरवालीतील ललीता तारक, व त्याच्या सासू यांची भर पडली. अत्तापर्यंत जरांगे पाटील यांच्यावरील आरोप करणारांच्या यादीत आंतरवाली गांव पुसटस्ही दिसून आले नाही. मात्र,ललिता तारक यांच्या जरांगे पाटील यांच्यावरील आरोपांमुळे एकच खळबळ उडाली. प्रत्यक्ष जरांगे पाटील यांनी रुग्णालयातून आंतरवाली सराटी येथील आंदोलनस्थळावरील मंडप, स्टेज आणि छत्रपती शिवाजी महराजांचा पुतळा हटवण्याच्या सहमतीने सूचना दिल्या होत्या.

प्रत्यक्ष ज्यामध्ये ग्रामसथा अथवा विरोधाचा सुतराम संबंध नव्हता हे जवळपास सिद्ध झालं आहे.


सोमवारी (दि.28)आंतरवालीमध्ये ग्रामसभा संपन्न झाली ज्यामध्ये जरांगे पाटील आणि स्टेज, व्यासपीठ याबद्दलच्या भ्रशब्दाचा उल्लेख करण्यात आला नाही, जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणारांनी स्टेज आणि व्यासपीठ काढल्याने जरांगे पाटील आता आंतरवालीच्या वेशीत पाय ठेवू शकणार नाहीत असं ठणकावून सांगत होते मात्र आज जरांगे पाटील यांनी रुग्णालयातून बाहेर पडताच स्वत:च्या घरी अंकुशनगर येथे जाण्यापूर्वीच ते आंतरवालीत दाखल झाल्याने जरांगे पाटलांवर बेछूट अरोपांच्या फैरी झाडणारांचे बारुदच गायब केले.


जरांगे पाटील रुग्णालयातून थेट आंतरवालीत दाखल होणार असल्याची ग्रामस्थांना तसूभरही कल्पना नव्हती त्यामुळे ऐनवेळी गावात दाखल झालेल्या जरांगे पाटलांचे स्वागत करण्यासाठी ग्रामस्थ, महिला शेतात राबत असताना हातातले काम टाकून जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी आंदोलनस्थळी दाखल झाल्या. जरांग पाटील यांनी ग्रामदैवतांचे दर्शन घेतल्यानंतर ग्रामस्थ महिलांशी संवाद साधला. यावेळी आरोप करणार्‍या महिले विषयी जरांगे पाटलांकडे गार्‍हाने मांडणार्‍या महिला ग्रामस्थांना जरांगे पाटील म्हणाले त्यावर मला काहीच बोलायचे नाही, ते आपलेच आहेत त्यांना आपण मागं हटायचं नाही मी हटणार नाही, आंतरवाली ग्रामस्थांची सेवा महाराष्ट्र कदापीही विसरणार नाही. मराठा आरक्षण आणि आंतरवाली याला मी डाग लागू देणार नाही. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आंतरवालीशी मराठ्यांची नाळ तुटू देणार नाही. बोलल्या प्रमाणे निर्णायक आणि शेवटचं आंदोलन आहे. तर हो हे शेवटचं निर्णायक आंदेालन आहे. आंतरवालीपासून सुरू झालेलं आंदोलन पाटोदा येथे स्थगित झालं आहे.


त्यामुळे सरकारला तीन महिन्याचा कालावधी दिला आहे, तीन महिन्यानंतर आंतरवालीच्या नावानेच पाटोदा येथून आंदोलनाला सुरूवात होईल असंही जरांगे पाटील म्हणाले.


आंदोलन स्थळावरचं स्टेज, व्यसासपीठ हटवल्याने करमत नसून सर्व काही बोडखं वाटत आहे. मी आहे दर शनिवारी, रविवारी मी आंतरवालीत येणारच अशी भावनिक सादही त्यांनी उपस्थित ग्रामस्थ नागरिकांना त्यांनी घातली.

Comments


bottom of page