जरांगे पाटील खूप हूशार माणुस, जीआर मुख्यमंत्रीसुद्धा रद्द करू शकत नाही! छगन भुजबळमुळेच ओबीसी आरक्षणाचं वाट्टोळं झालं- हारिभाऊ राठोड
- Navnath Yewale
- Oct 11, 2025
- 3 min read

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईत आझाद मैदानातील आंदोलनाची दखल घेऊन सरकारने जरांगे पाटील यांच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य केल्या. प्रथम मागणीनुसार मराठा समाजास ओबीसीतून कुणबी आरक्षणासाठी हैदराबाद, सातारा गॅझेटिरसह बॉम्बे गव्हरमेंटचं गॅझेटिअर. त्यानुसार पहिल्या टप्यात हैदराबाद गॅझेटिअरचा जीआर सरकारने आंदोलनस्थळीच जरांगे पाटीलयांच्या हातात सोपवला. हा मराठा आरक्षण आंदोलनाचा सर्वात मोठा विजय होता.तसा विजयोत्सवही राज्यभरात साजरा करण्यात आला.
हैदराबाद गॅझेटिअरचा जीआर प्रसिद्ध होताच ओबीसी नेत्यानी जीआरवर आक्षेप घेत ओबीसी आरक्षण संपल्याचा दावा करत जीआर रद्द करण्याची मागणी केली. मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारवर नाराजी व्यक्त करत थेट न्यायालयात धाव घेणार्या असल्याचे दूसर्याच दिवशी प्रसार माध्यमांसमोर सांगितले. जरांगे पाटील यांची निष्ठा, कसोसी, सचोटी, अभ्यास, जिद्द, कौशल्यासह गनिमी काव्यामुळे मराठा आरक्षण लढ्याला विजयाची कलाटणी मिळाली.
दोन वर्षापूर्वी लाठी हल्ल्यानंतर काँग्रेस आमदार विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आंतरवाली सराटी येथे भेट देवून मराठवाड्यातील मराठा कुणबी आहे. त्यांना कुणबी म्हणून आरक्षण मिळायलाच हेव असे ठणकावून सांगितले. सकरारच्या उदाशिन धोरणांमुळे मराठा समाजावर ही वेळ आल्याचेही वडेट्टीवार म्हणाले होते.
खरं तर वडेट्टीवार यांची ही व्हिडिओ क्लिप नागपूर मोर्चा पूर्वी प्रसारमाध्यमांवर व्हायरल झाली.
जीआर नंतर ओबीसी नेत्यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीकेची कुठलीच संधी सोडली नाही. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी तर अश्लाघ्य भोषेत जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. यावर जरांगे पाटील यांनी ‘मी त्यांना महत्व देत नाहीट’ प्रत्युत्तर देण्याचं टाळलं. जरांगे पाटील यांच्यावर टीकेचा परिणाम होत नसल्याने नवनाथ वाघमारे यांनी थेट समाजावर बोलण्याचं धारिष्ठ केलं. त्यास मराठा समाजातून उलट प्रतिक्रिया आल्या मात्र, तरीही जरांगे पाटील शांतच.
हैदराबाद गॅझेटिअरच्या जीआरमुळे मराठा आरक्षणाचा लढा पुरता जिंकल्यात जमा असतानाही जरांगे पाटील शांतच होते. ठरवलं असतं तर जरांगे पाटील यांनी ओबीसी नेत्यांच्या टीकेला आपल्या शैलीत उत्तर दिलं असतं. पण, जरांगे पाटलांनी संयम बाळगला तो, आरक्षणाच्या पुढच्या ध्येय धोरणासाठीच असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
कारण जीआर विरोधात मा. हायकोर्टात नेमक्या किती आणि कोणाच्या याचिका दाखल होतात याची वाट पाहाणं महत्वाचं होतं. मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर येऊन पाच सहा याचिका दाखल झाल्याचे सांगितले. त्यानंतर जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्या नेहमी प्रमाणे टीकास्त्र डागलं.
मुळात आज मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, असं म्हणणार्या प्रस्थापितां पैकीच दोन 50 टक्क्यांच्या वरंच आरक्षण कोर्टात आपली माणंस पाठवून प्रसंगी त्यांना आर्थिक रसद पुरवून रद्द करायला लावलं असा मराठा समन्वयकांचा आरोप आहे. या आरोपातही तथ्य असल्याचं आजच्या हारिभाऊ राठोड यांच्या वक्तव्यावरून सिद्ध होतं असच म्हणावा लागेल.
एकीकडे मराठा समाजास 50 टक्क्यांच्या वरच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टात इंद्रा सहाणी खटल्याचा संदर्भ देऊन रद्द करायचं. दुसरीकडे मराठा समाजास ओबीसीतून 50 टक्क्यांच्या आत आरक्षण या जरांगे पाटील यांच्या मागणीला असंविधानीक दाखवण्याचा प्रयत्न करायचा. त्यातच सरकारने ओबीसी आरक्षणासाठी पुरावा आवश्यक असल्याचे सांगत नोंदी शोधण्यासाठी सेवानिवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी पुरव्यासोबत प्रमाण ठरल्या. जरांगे पाटील यांनी नोंदीचा धागा पकडून सरकारला ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीसाठी धारेवर धरले.
मुंबईत आझाद मैदानावर लाखो मराठा बांधव दाखल होणार याचा आंदाज घेत अगदी परवानगी पासून आंदोलनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत सरकारने रसद बंद करण्यापासून पोलिस, न्यायालयीन असे सगळे डाव टाकेल मात्र, जरांगे पाटीलांच्या गनिमी काव्यापूढे सगळे फोल ठरले.
जरांगे पाटील यांचे आदोलन सर्वच बाजूने पोलादी भिंतीसारखे भक्कम आणि तसुभरही डळमळीत होत नाही, त्यातच मुंंबई जाम अशा चोहो बाजूने घेरल्यानं बाका प्रसंग टाळण्यासाठी पुराव्यानुसार मराठा समाजास आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेटिअरचा जीआर काढला आणि उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामार्फत जरांगे पाटील यांच्याकडे आंदोलनस्थळी सोपवला.
यामध्ये मुंबईतील गर्दी लवकर कमी व्हावी अशी अपेक्षा मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली. अवघ्या सहा तासात मुंबई मोकळी करण्याचे अश्वासन जरांगे पाटील यांनी मंत्री विखे पाटलांना दिले.
तत्पूर्वी जरांगे पाटील यांनी नेहमी प्रमाणे आंदोलनस्थळीच जीआर उपस्थित अभ्यासक, तज्ज्ञांच्या समोर मांडला आणि बदल सूचवण्याची मागणी केली. त्यानुसार अभ्यसकांनी जीआरला ग्रीण सिग्नल दिला. या प्रक्रियेतून जरांगे पाटील यांनी आपले समाजातील स्थान कायम ठेवले.
आगदी अलिकडेच नागपूर मोर्चाच्या पार्श्वभूमिवर विजय वडेट्टीवार यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवत नागपूर मोर्चाची तयारी केली. मात्र, जरांगे पाटील यांनी वडेट्टीवार यांच्यावर वैयक्तिक टीका टाळत थेट दिल्लीचा लाल्या म्हणत हा मोर्चा ओबीसींचा नसून काँग्रेसचा असल्याचे म्हणत वडेट्टीवार यांच्या मोर्चाचं एकप्रकारे महत्वच कमी करुन टाकलं. यामध्ये जरांगे पाटलांनी एका दगडात अनेक पक्षी टिपले.
वडेट्टीवार यांची जीआर विरोधातील भूमिका ही पक्षाची का त्यांची वैयक्तिक या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा गनिमी काव्याचा अवलंब करत ‘दिल्लचा लाल्या ’ या म्हणत थेट काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनाच डिवचले. मात्र, काँग्रेस हायकमांडकडून प्रतिउत्तर न आल्याने हा मोर्चा काँग्रेस पुरस्कृत असल्याच्या जनभावना उमटल्या. छगन भुजबळ यांच्यासह मुंडे बंधु-भगिणींनीही मोर्चाकडे पाठ फिरवली.
ओबीसी नेते हारिभाऊ राठोड यांचे आजचे वक्तव्य जरांगे पाटील यांच्या कर्तुत्वाला साजेसं आहे. जरांगे पाटील खूप हुशार आहे, त्यांनी सरकारकडून काढलेला जीआर कोणीच रद्द करू शकत नाही, अगदी मुख्यमंत्री सुद्धा. आम्ही सांगत होतो छगन भुजबळ यांना ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही म्हणाले होते. छगन भुजबळ यांनीच ओबीसी आरक्षणाचं वाटोळं केलं असा घणाघात हारिभाऊ राठोड यांनी केला.



Comments