top of page

पुन्हा बदली : आयएएस जी. श्रीकांत यांची 15 दिवसांत दुसरी बदली; राज्यातील 4 सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या

राज्यातील आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्यांचा धडका सुरुच असून कालच 5 सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर, आज पुन्हा एकदा चार आयएएस आधिकार्‍यांच्या बदल्या करणत आल्या आहेत. विशेष म्हणजे, या चार अधिकार्‍यांमध्ये जी. श्रीकांत यांचाही समावेश आहे. जी श्रीकांत हे सध्या नवी मुंबई जल जीवन मिशन अभियानाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. मात्र, आता त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तपदी नियुक्ती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, 3 एप्रिल रोजीच त्यांची जल जीवन मिशन नवी मुंबई येथे मिशन संचालक पदावर बदली करण्यात आली होती. त्यामुळे, गेल्या 15 दिवसांत ही त्यांची दुसरी बदली आहे.


जी. श्रीकांत हे 2009 च्या युपीएसस बॅचचे आयएएस अधिकारी असून गेल्या 15 दिवसांपूर्वी ते छत्रपती संभाजीनगर मनपाचे आयुक्त होते. मात्र, 3 एप्रिल रोजी अभियान संचालक, जल जिवन मिशन, नवी मुंबई येथे त्यांची बदली करण्यात आली होती. ते तिथे कार्यरतही होते. आता, त्यांची विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर विभाग येथे नियुक्ती करण्यात आली. तर, जितेंद्र पापळकर विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग यांची जीएसटी, मुंबई सह आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पापळकर हे 2010 च्या युपीएससी बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.


जी. श्रीकांत यांच्याजागी गंगाथरण डी. यांची मिशन डायरेक्टर, जल जीवन मिशन, नवी मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गंगाथरण हे 2013 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. यासह, जगदीश मिनियार मुख्य प्रशासक (नवीन टाऊनशिप), सिडको, छत्रपती संभाजीनगर यांची महिला व बालक आयुक्त पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मिनियार हे 2015 च्या बॅचचे युपीएससी उत्तीर्ण अधिकारी आहेत.


दरम्यान, कालच पाच अधिकार्‍यांच्या बदलीचे आदेश निघाले होते, त्यानंतर आज आणखी चार अधिकार्‍यांची बदली करण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.


काल 15 एप्रिल रोजी बदली केलेले अधिकारी : डॉ.बी.एन. पाटील (आयएएस: नॉन-एससीएस:2014) , संचालक, पर्यटन, मुंबई यांची प्रकल्प संचालक, रुसा उच्च व तंत्रशिक्षण विभाग मुंबई येथे बदली झाली आहे. मंगेश जोशी (आयएएस: एससीएस: 2015), उपमहासंचालक, यशदा पुणे यांची संचालक, पर्यटन मुंबई येथे बदली झाली आहे. यासह, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम (आयएएस:आरआर:2020), यांची अतिरिक्त अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी येथे बदली करण्यात आली आहे. कुशल जैन (आयएएस:आरआर:2022), प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, अहेरी आणि सहायक जिल्हाधिकारी, अहेरी उपविभाग, गडचिरोली यांची मुख्य सोलापूर जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी पदावर बदली करण्यात आली. तर, रेवैया डोंगरे सहरायक जिल्हाधिकारी, भूम उपविभाग, धराशिव यांना यवतमाळ येथे प्रकल्प अधिाकरी, आयटीडीपी पांढरकवडा आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, केळापूर उपविभाग म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.

Comments


bottom of page