जरांगे पाटील यांच्या कायदेशीर मागण्यांकरिता चर्चेची दारे खुली - मुख्यमंत्री फडणवीस

नागपूर : मराठा आरक्षणाच्या आंमलबजवणीसाठी विविध मागण्यां घेवून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील शनिवार (दि.29,ऑगस्ट ) पासून आंतरवाली सराटी येथे उपोषणास बसले आहेत. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी थेट जात पडताळणी समितीच बरखास्तीची मागणी केली. जरांगे पाटील यांच्या या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदेशीर मार्ग काढणार असल्याची प्रतिक्रया माध्यमांना दिली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस, कुणबी जात वैधता प्रमाणपत्र रद्द प्रकरणावर जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या पहिल्या दिवशी संताप व्यक्त करत सरकारला अल्टिमेट दिला. तहसीलदार, एसडीएम कागदपत्र तपासून जात प्रमाणपत्र देत असतील तर पडताळणी हवी कशाला? असा सवाल उपस्थित करत जरांगे पाटील यांनी थेट जात पडताळणी समितीच बरखास्त करण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘ मला असं वाटतं की जे काही आंदोलन चालले आहे. त्या आंदोलनात सरकारचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत. ते चर्चा करणार आहेत. यापूर्वीही आपण मार्ग काढला आहे. पुढेही आपण मार्ग काढणार आहोत. उपमुख्यमंत्री शिंदे हे सुरवातीपासून अतिशय संवेदनशीलतेने काम करत आहेत.’ जात पडताळणी समिती रद्द करण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ज्या काही मागण्या कायदेशीर असतील संविधानाच्या अंतर्गत असतील आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं उल्लंघन करणार्या नसतील अशा सगळ्या मागण्यांकरिता आम्ही चर्चेची दारे खुली ठेवली आहेत.
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला, ते म्हणाले गोरेवाडा प्राणी उद्यान तयार केलं. शहरापासून सहा किलोमिटर अंतरावर आहे. मागील 25 वर्षांपासून प्राणी उद्यान तयार करण्यासाठी प्रयत्न करत होतो. रेस्क्यू सेंटर सुरू केलं. त्यानंतर इंडियन सफारीची सुरुवात केली. पुढच्या वर्षी अफ्रिकन सफारी सुरू करण्याचा प्रयत्न आहे. यात देशातील सार्वत चांगलं रेस्क्यू सेंटर झालं आहे. जेवढे डॉक्टर आहेत. जे महत्वाचे प्राणी आहेत, त्यांना त्यांच्यावर शिकण्यासाठी संधी मिळत नाही. ती संधी येथे मिळेल. मोठ्या प्रमाणात डॉक्टर येत आहेत. इतर काही स्टाफ येत आहेत. त्यांचही ट्रेनिंग होईल.’
देशभरात येथून प्राणी चालले आहेत. मी फेरफटका मारला. बिबट्या, वाघ असे सर्व प्राणी पाहायला मिळाले. याचा पुढचा टप्पा कसा करायचा याबाबत माझी वनमंत्री गणेश नाईक यांच्यासोबत बैठक आहे. इकडे चांगलं हॉटेल व्हावं, अशीही पुढची कार्यवाही आहे. आफ्रिकन सफारी आकर्षणाचं केंद्र ठरेल. बीग फाईव्ह या सफारीच्या माध्यमातून येतील. जगभरात ज्यांना पाहण्यासाठी जातात, ते येथे उपलब्ध होतील. शाळेचे मुलं येत आहेत. दिर्भासह मध्यप्रदेशातून विद्यार्थी येत आहेत, अशी माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.



Comments