जरांगे पाटील यांच्या बैठकीवर मधमाशांचा हल्ला!
- Navnath Yewale
- Sep 21
- 1 min read
आंतरवाली सराटीतील घटना,समन्वयकांचे प्रसांगवधान; गोंधळानंतर बैठक पुन्हा सुरू

जालना: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोजक्या समन्वयकांची आज आंतरवाली सराटी येथे बैठक बोलावली होती. आंतरवाली सराटी येथील सरपंच तारक यांच्या शेतामध्ये लिंबाच्या झाडाखाली बैठक सुरू होती अचानक परिसरातील मधमाशांचा जथ्था बैठकस्थळावरून घोंगावत असल्याचे लक्षात येताच समन्वयकांनी घटनेचे गांभीर्य राखून तात्काळ जरांगे पाटील यांना सुरक्षीत स्थळी झाकून नेले.
तालुक्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी प्रशासनशी समन्वय साधणार्या मोजक्या समन्वयकांची आज आंतरवाली येथे बैठक बोलवण्यात आली होती. दुपारी बैठक सुरू झाली, त्यावेळी अचनाक मधमाशांनी हल्ला केला. त्यामुळे काही वेळासाठी बैठकीत गोंधळाचं वातावरण निर्माण झाले. दरम्यान, बैठकीसाठी आलेल्या समन्वयकांना मधमाशांनी चावा घेतल्याची माहिती आहे.
मधमाशांच्या हल्ल्यामुळे समन्वयकांनी बैठकीतून जरांगे पाटील यांना गळ्यातील उपरण्याने झाकून सुरक्षीत स्थळी काढले. त्यानंतर बैठक पुन्हा सुरू झाली.



Comments