top of page

जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनावर मंत्री छगन भूजबळ बोलले, जरांगे पाटलांचे प्रत्यूत्तर

ree



मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलनाची इशारा दिला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथ मंत्री छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यातील वाक्कयुद्ध उभ्या महाराष्ट्राने उनुभवलं आहे. जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. कोणीही आडवं आलं तरी मुंबईत आंदोलन होणारचं या जरांगे पाटलांच्या इशरा बाबत मंत्री छगन भुजबळ यांना प्रश्न विचारला असता कोणीही आडवं येत नाही, संविधानाच्या चौकटीत राहून काही ही कर असा मिश्किलीने टोला लगावला. यास आता जरांगे पाटील यांनी प्रत्यूत्तर दिले आहे.



मुंबई येथे 29 ऑगस्ट रोजी नियोजीत आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर जरांगे पाटील मराठवाड्याच्या दौर्‍यावर आहेत. आज नांदेड येथे बैठकीस संबोधीत केल्या नंतर जरांगे पाटीलयांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या आंदोलन जालन्यात किंवा आंतरवाली सराटीत कर, आंदोलन मुंबईत कर नाहीतर दिल्लीत कर, त्याला कोण आडवं येत आहे. पण आंदोलन नियमात करा. संविधानाने दिलेला अधिकार आहे. उपोषण कर, भाषण कर पण नियमात कर. मात्र कोणती कुरघोडी करू नये. मराठा समाजाला आरक्षण देता आले ते दिले, आणखी काय पाहिजे? इतर कोणत्या समाजात गेलं तर कोणी सहन करणार नाही. ओबीसी समाजात काणी शिरकाव करत असेल तर गप्प बसणार नाही.


या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता जरांगे पाटील संतापून म्हणाले की, तुला कोणी विचारलं का? तु आम्हाला शिकवायची गरज आहे का? लोकशाही, संविधान , कायदा तु शिकवायची गरज नाही आम्हाला. कारण इतक्या नाशक्या माणसांकडून आम्हाला नियम शिकायची गरज नाही. ज्याने जाती-जातीत माणुसच ठेवला नाही. जाती-जातीत माणंस गुण्या गोविंदाने नांदत होते ते एका जाग्यावर ठेवले नाही. सगळ्यात मोठा विघातक माणुस ज्याने समाजा समाजामध्ये तेढ निर्माण केला तो छगन भुजबळ आहे. त्याच्यावरती मी काही बोललो होतो का? त्याला काही बोलायची गरज होती का? तो प्रत्येक वेळेस ओबीसीचा ठेका घेतला म्हणतो आणि ओबीसींचच वाटोळं करतो. आज मराठ्यांच्या आणि ओबीसीच्या माणसात माणुस ठेवलं नसेल तर ते छगन भुजबळ यांनी ठेवलं नाही. तु आम्हला नियम शिकवू नको आमचं सगळ नियमात चालू आहे. मुंबईला आम्ही नियमात जाणार आहोत, जालन्यात पण आमचं नियमातच आहे. कुठही गेलोत तर आम्ही नियम आणि लोकशाही, कायदा सोडून करत नाही. तु आम्हाला नियम शिकवायची गरज नाही.


तु माणसात माणुस ठेवला नाही ओबीसीचा याचं पाप तुझ्या डोक्यावर आहे , याचं फळ तुला भोगावं लागणार आहे. कारण तु गोरगरिब मराठा आणि गोरगरिब ओबीसी यांच्यात माणसात माणुस नाही ठेवला. तुझ्या राजकीय स्वार्थासाठी ओबीसी - मराठ्यात वाद लावला. ओबीसी आणि मराठ्यांचा खरा शत्रु आसंन तर तो छगन भुजबळ आहे. यावर छगन भुजबळ यांच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही या वक्तव्यावर पाटील म्हणाले की. आरे घेतलं तु काय धक्का लागून देणार नाही, घेतलं आम्ही आमचं हक्काचं आहे. नोंदी आहेत, गॅझेट आमच्या हक्कांचे आहेत तिन्ही पण. आम्ही घेतलय मराठा आणि कुणबी एक आहेत 58 लाख नोंदीचा अहवाल आहे हे सिद्ध झालं आहे. आम्ही घेतलयं तु उगीच शहणा राह शाहणा हो पागल सारखं करू नको. तुला मंत्रीपद मिळालंय ना? गप तुकडे मोडून खाय तु आता तु भोकायचं काम करू नको, तुझ्यामुळं देवेंद्र फडणवीस पुन्हा आडचणीत येईल. आणि तिन्ही पक्षाची सत्ता तुझ्या एकट्यामुळं पुन्हा आडचणीत येईल. तु आपलं निट रहा तुझं भागलंय आता.


दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सहन करणार नाही या वक्तव्यावर जरांगे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली पाटील म्हणाले की, त्याला काही डोकं आहे की नाही, कशाला मंत्री केलयं अजित दादांनी काही कळतच नाही. आरे मराठ्यांच्या नोंदी सापडल्या मराठे ओबीसीत जाणार आहेत. ते पण फडणवीस सरकारलाच निहावे लागणार आहे मराठ्यांना. कारण आमच्या नोंदी सापडल्या. आमची जर जमिन सापडली सातबार्‍यांसह तुम्ही कसकाय देत नाहीत. त्यामुळे त्याच्या भुंकण्यानं काहीच होत नाही. छगन भुजबळ म्हणजे संपलेला माणुस आहे. संपल्यालं असताना काय करायचं राजकीय स्वार्थ कसा साधायचा तर मग तो मराठ्यात आणि ओबीसीत माणसांत माणुस ठेवायचं नाही आणि वाद लावायचा हे त्याचं काम आहे.


हे आता सगळ्या ओबीसींनी ओळखलंय त्याने एकदा बोलून दाखवलंय ओबीसी कुठली तरी सभा होती त्याची सभेला लोकच आले नाही. खुर्च्याच मोकळ्या होत्या, तर तो म्हणाला तुम्हाला येता सुद्धा येत नाही. कारण लोकांनी ओबीसींनी ओळखलंय की हा मराठ्यांचे आणि ओबीसींचे विनाकारण वाद लावतोय नाराज्या पसरतोय राजकीय स्वार्थ साधतोय याला मंत्री पदासाठी ओबीसी म्हणतो मंत्रीपद मिळालं की ओबीसींना विसरतोय लोकांच्या लक्षात आलं ओबीसींच्या. मराठा-ओबीसी गावखेड्यात एक राहणार आहे. माझं नांदेड नगरीतून मराठ्यांना अव्हान आहे ओबीसी मराठ्यांत यांनी चार- पाच जणांनी ज्यांनी ठेका घेतलाय देवेंद्र फडणवीस, भूजबळचं ऐकून ओबीसी- मराठ्यात एकमेकामध्ये आजिबात वाद करायचा नाही आपण दोघांनी एकमेकांच्या आंगावर जायचं नाही. ओबीसी बांधवांनाही सांगतो तुम्ही विरोध केला तरी आम्ही आरक्षणात जाणार आहोत कारण आमच्या नोंदी सापडल्यात आणि आमच्या लेकरां बाळांचं वाटोळ व्हावं असं एकाही ओबीसींना वाटत असंही जरांगे पाटील म्हणाले.

Comments


bottom of page