जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनासाठी नाशिकवासीयांनी घेतली मोठी जबाबदारी
- Navnath Yewale
- Aug 24
- 2 min read

दिड दिवसाचा गणपती साजरा करून जिल्ह्यातील लाखो मराठा बांधव 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानवरील आंदोलनात सहभागी होतील. या आंदोलनासाठी गरज पडल्यास नाशिक जिल्हा आर्थिक रसद व भोजनाची जबाबदारी उचणार असल्याचा ठराव सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आला.
मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमिवर पूर्वतयारीसाठी येथील कालिका मंदिरात सकल मराठा समाजाची बैठक पार पडली यावेळी शहरासह सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव, नांदगाव, येवला आणि चांदवड तालुक्यांतील समाजबांधव उपस्थित होते.प्रदिर्घ काळापासून हे आंदेालन सुरू आहे.
अनेकदा निवेदने दिली गेले परंतु सरकार निर्णय घेत नसल्याने मनोज जरांगे यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. हे आंदोलन तीव्र केले जाईल. मराठा समाजाची ताकद सरकारला परवडणारी नाही. मागण्या मान्य होईपर्यंत आझाद मैदानात तळ ठोकण्याचा इशारा पदाधिकार्यांनी बैठकीत दिला.
यावेळी विविध ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील सुमारे पाच लाख मराठज्ञ समाजबांधव स्वत:ची वाहने व रेल्वेने मुंबईत दाखल होतील. गणेशोत्सव दीड दिवसांचा साजरा करून, पूर्ण ताकदीने सहभाग आदी ठरावांचा समावेश आहे. आंदेालनात कशाचीही कमतरता भासणार नाही.
आंदोलन जितके दिवस चालले, तितके दिवस अन्न धान्याचा पुरवठा करण्याची नाशिकची तयारी आहे. गतेवळप्रमाणे आर्थिक रसद व भोजनाची जबाबदारी स्वीकारण्याचा ठराव करण्यात आला. मुंबईतील आंदोलनात महिला व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी होतील. यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्हा पूर्ण ताकदीने उभा राहिल, असा निर्धार बैठकीत व्यक्त झाला. काही कार्यकर्त्यांवर पालघर, नाशिक, कोकण, अहिल्यानगर आणि इतरही काही जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. बैठकीला करण गायकर, नानासाहेब बच्छाव, विलास पांगरकर, अण्णासाहेब पाटील, नितीन सुगंधी आदींसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
मराठा समाजाचे पदाधिकारी जिल्ह्यातील मराठा मंत्री व लोकप्रतिनिधींची भेट घेणार आहे. आंदोलनास त्यांनीही पाठिंबा देण्याची मागणी करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आंदोलक शहरातून 29 तारखेला सकाळी सात वाजता ग्रामदैवत श्री कालिका माता मंदिरात दर्शन घेऊन मुंबईकडे प्रस्थान करतील.



Comments