जरांगे पाटील यांना रुग्णालयातून डिस्चार्ज,आंतरवालीकडे रवाना
- Navnath Yewale
- Oct 8
- 3 min read
अजित पवारांनी साप पाळलेत, अजित पवारला संपवायचं मोठं षडयंत्र; वेळीच सावध व्हाव, मराठा आरक्षणाला विरोध करणारांमध्ये अजित पवार पक्षाचेच जास्त कसे असा प्रश्न उपस्थित करत जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ, मुंडे, वडेट्टीवार यांच्यावर पत्रकार परिषदेतून हल्लाबोल केला.

छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजी नगर येथील गॅलॅक्सी या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. नारायणगड येथील दसरा मेळाव्या पूर्वी जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात उपाचारार्थ दाखल करण्यात आले होते. प्रकृती खालावलेली असताना त्यांनी दसरामेळाव्यास संबोधित केले होते. मराठा आरक्षणा विरोधात जे बोलेल त्यांना जशास तसे उत्तर देण्याचा इशारा देत जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यात छगन भुजबळ यांच्यासह मुंडे बंधु भगिणींवर जोरदार टीका केली. काँग्रेस उमेदवार विजय वडेट्टीवार यांनी जरांगे पाटील यांच्याकडूनही सडेतोड टीका करण्यात येत आहे. आज जरांगे पाटील यांनी डिस्चार्ज पूर्वी पत्रकार परिषदेतून ओबीसी नेत्यांवर हल्लाबोल केला.
जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयाच्या सुरक्षेत दोन दिवसांपासून वाढ करण्यात आली होती. मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार यांच्या टोकाच्या टीकेला जरांगे पाटील तेवढ्यात जोमाने प्रखर प्रत्यूतर देत आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूच्या टीकेची पातळी लक्षात घेता अनुचित प्रकार टाळण्यासाठी सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, रुग्नालयातून डिस्चार्ज मिळण्यापूर्वी नेहमीप्रमाणे जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेतून मंत्री भुजबळ, विजय वडेट्टीवार यांच्या हल्लाबोल करत थेट अजित पवार यांना सावधानतेचा इशारा दिला. अजित पवारांनी साप पाळून ठेवले आहेत.
अजित पवार यांनी वेळीच सावध व्हावे अन्यथा पश्चातापाला वेळ मिळणार नसल्याचा इशरा जरांगे पाटील यांनी दिला. याचा पश्चात होईल. मराठा आरक्षणाचा जीआर रद्द करण्यासाठी हे मोर्चे काढायला लागायलेत. आता मराठ्यांनी जशास तसं उत्तर द्यावं लागणार आहेत. मराठ्यांना ताकदीने उभं राहावं लागणार आहे. छगन भुजबळ यांनी खूप मोठं षडयंत्र रचलेलं आहे अजित दादा संपविण्यासाठी. मराठा आरक्षण विरोधात बोलायचं म्हणजे अजित पवारचा पक्ष बदनाम होणार. आरक्षणाच्या विरोधात बोलणारे जास्त अजित पवार पक्षाचेच नेते आहेत. निवडणुकीच्या काळात हा केवळ नादी लावतोय. भुजबळचं ऐकून ओबीसींनी मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका असं आवहन आहे. पवार चुलते पूतण्यांनी ठासून बोललं तर छगन भुजबळ गप्प बसणार आहे.
तुम्हाला आम्हीच आरक्षण दिलंय, मराठ्यांच्या नोंदी निघाल्या आहेत. तुम्हाला देताना आम्ही मराठा असून मराठ्यांनी विरोध केला नाही आता गप्प बस. असे प्रश्न छगन भुजबळला विचारल्यास भुजबळ गप्प बसणार आहे. यांनी गोड बोलून हासून खेळून अजित पवारांचा गेम करायचा सुरू केलं आहे. दोन्ही पवारांना ओबीसी आणि मराठा पाहिजे असतील तर त्यांनी आता खरं बोलावं मराठ्यांच हक्काचं आरक्षण आहे असं म्हणा. अलिबाबा (भुजबळ) मला गेममध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहे. कोणालाही, कसल्यांनाही पुढं करतो. तुझ्यामुळं राज्यात वाईट परिस्थिती निर्माण करतो. छोट्या-छोट्या जातीचे नेते सोबत घेतो त्यांना मराठा ही मानतो त्यांच राजकिय अस्तीत्व धोक्यात येईल.
तीन वेळा जेलमध्ये जाऊन आलास, आदेश द्यायला तु काय कलेक्टर आहेस का? मराठ्यांच्या नेत्यांनी कोणत्याही पक्षात राहा पण छगन भुजबळ चा बुडबुडा फोडावाच लागेल. मराठा अधिकारी कर्मचार्यांना जानिवपूर्वक त्रास द्यायला सुरूवात झाली आहे. मराठ्यांविरोधात बोलणार्या, द्वेष बाळगणार्यांना 2029 मध्ये झीरो करायचं आहे. मराठ्यांनी आता शेती एवढेच महत्व आरक्षणाला द्यायची गरज आहे. वारंवार लढून आपल्या लेकरांच्या हातात नोकरी देणं गरजेचं आहे. शेतकर्यांवर संकट आलं म्हणजे रडत बसू नका दुसरं काही मिळवायचं बघा. आपण एवढी ताकद दाखवायची शेतीबरोबर आरक्षण टीकवायचं. मराठ्यांच्या नेत्यांनी आता ओबीसी नेत्यांप्रमाणे समाजाच्या बाजूने उभं रहा. मराठ्यांच्या बाजूने उभं रहा मराठ्यांचं आरक्षण जाऊ देवू नका. मला एडं म्हणणारांनाच वेड लागलं आहे.
त्यांच्यात नेता होण्याची स्पर्धा लागली आहे. भुजबळ यांच्या 17 ऑक्टोबरच्या महासभेवर पाटील यांनी निशाना साधला त्याला कामच काय आहे. चिथावणीखोर वक्तव्य करायचं जातीवाद घडवून आणायचा, परळीच्या टोळीनेच जाळपोळ केल्याचं बांगर म्हणाले, याचं हॉटेलही यानेच जाळलं. याचा जिल्हा सोडून ईकडं काय आहे त्याचं हे पुरा देव्हारा करणार आहे बीडचा. फारकत घेतल्यासारखं वागायला लागलेत आता. तु शंभर दिडशे लोकांची टोळी केलीस माझ्या विरोधात. पण तु काही कर औरंगजेबासारखं इथच मेलो पण नाहीच जिंकलो. संताजी धनाजी सारखे मग खपाखप दांडक्याने रेटायला लागले इथच मेलं आणि गेलं. तसं तुझ स्वप्न पूर्ण होवू देत नाही आलिबाबा( भुजबळ) दोनशे कर नाही तर पाचशे कर.
कितीही लोकांची टीम करत तुला जिंकू देत नाही. जीआरला जर धक्का बसला, आणि प्रमाणपत्र वाटायचे थांबवले तर सरकारलाही कळल कचका मराठ्यांचा. छोट्या जातीच्या लोकांना हाताशी धरण्याचा नवा डाव टाकला त्याने आता. त्याच्या व्यासपीठावर दिसणारां मराठ्यांच्या लक्षात येतोय. त्यांना सांगतोय त्याचं ऐकून आम्हाला विरोध करू नका. त्याला आम्ही यश येऊ देणार नाहीत. आम्ही यांना लहाण भाऊ समजायचो पण याने टोळी तयार केली माठ्यांशी शत्रुत्व साधत आहे असा हल्लाबोल जरांगे पाटील यांनी यावेळी केला.



Comments