जरांगे पाटील हत्या कट प्रकरण: दोघांचीही नार्कोटेस्ट करा- आमदार सोळंके
- Navnath Yewale
- Nov 15, 2025
- 1 min read

बीड: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची हत्येचा कट रचल्या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांनीच हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. धनंजय मुंडे यांनी केलेल्या नार्कोटेस्टच्या मागणीला जरांगे पाटलांकडून नार्कोटेस्टचेच प्रत्यूतर देण्यात आल्याने वाद शिगेला पेटला असतानाच आता आमदार प्रकाश सोळंके यांनी दोघांचीही नार्कोटेस्ट करा अशी मागणी केली आहे.
जरांगे पाटलांनी हत्येचा कट रचल्याचा आरोप करताच धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेतून ब्रेन मॅपिंग, सीबीआय चौकशीसह नार्कोटेस्टची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. धनंजय मुंडे यांच्या अव्हानाला जरांगे पाटील यांनी प्रत्यूत्तर देत आपणही नार्कोटेस्टला तयार आहोत, आगोदर मी स्वत: नर्कोटेस्ट करण्याची अर्जाद्वारे मागणी करत असून याही पेक्षा पुढची टेस्ट व चौकशीला सामोरं जाण्याची तयारी असल्याचे सांगत धनंजय मुंडे यांचे आव्हान स्वीकारले होते. त्यानुसार जरांगे पाटील आता नार्कोटेस्टवर अडून आहेत. दरम्यान, जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी प्रथम अमोल खुणे, दादा गरुड यांच्यानंतर जरांगे पाटीलयांनी केलेल्या अरोपानुसार धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय कांचन साळवी यांना पोलिसांनी अटक केली आहे.
जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी राज्यभरातील मराठा समाजा आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत दूसरीकडे मुंडे समर्थकांकही आक्रमक होत असल्याने सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. याप्रकरणात आता राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे माजलगाव विधानसभेचे आमदार प्रकाश सोळंके यांनी दोघांच्याही नार्कोटेस्टचा सल्ला दिला आहे. आज माध्यमांशी बोलताना आमदार सोळंके म्हणाले की, एखाद्या समाजाच्या नेत्याबाबत असं वागणं दुर्दैव आहे. जरांगे पाटील यांनी मागणी केली आहे तर दोघांचीही नार्कोटेस्ट करायला पाहिजे. सत्य काय आहे ते जनतेसमोर येणं गरजेचं असल्याचंही आमदार सोळंके म्हणाले.



Comments