top of page

जातिवाद करणारी घाण संपल्याशिवाय राज्यात सलोखा राहणार नाही - जरांगे पाटील

वडेट्टीवारांना ओबीसीच्या नावाखाली काँग्रेस शटल करायची आहे. ओबीसीच्या नावाखाली काँग्रेसचा मोर्चा काढायचा असा दावा करत मरठ्यांनो कडवट वागायचं शिका; द्या, मया सोडा आरक्षणाच्या विरोधात बोलणार्‍यांचे राजकिय अस्तीत्व संपवा असे अवाहन जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेतून केले.

ree

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि.4) सह्याद्री अतिथीगृहावर ओबीसी नेत्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत मंत्री छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झाले. विधी व न्याय विभागाच्या परवानगी शिवाय हैदराबाद गॅझेटिअरचा जीआर कसा काढला असा सवाल उपस्थित करत भुजबळ यांनी जीआर रद्द करण्याची मागणी केली. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी जीआर रद्द करण्याची मागणी केली तर मंत्री पंकजा मुंडे यांनी 2014 पासून वाटप करण्यात आलेल्या जात प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली.


ओबीसी नेत्यांच्या बैठकीनंतर वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधत जरांगे पाटील यांच्यावर निशाना साधत सरकारने तात्काळ मराठा आक्षरणासाठी लागू केलेला हैदराबाद गॅझेटिअरचा जीआर रद्द करावा अन्यथा 10 ऑक्टोबरला नागपूर येथे ओबीसींचा मोर्चा निघणार आहे. सरकाने जीआर रद्द करून त्यांचा प्रतिनिधी मोर्चात पाठवावा आम्ही त्यांचे स्वागत करू असं वक्तव्यही वडेट्टीवार यांनी केले.


दरम्यान वडेट्टीवार जरांगे पाटील यांच्यावर चांगलेच संतापले जरांगेला म्हणा ओबीसीतल्या 374 जाती समुद्रात बुडव म्हणा, बंदुक, तलवार घेवून चालवा आमच्या गळ्यावर टाका मारून अशा शब्दात वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला.


वडेट्टीवार यांच्या संतापावर जरांगे पाटील यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयातून पत्रकार परिषदेद्वारे वडेट्टीवार यांच्यावर निशाना साधला. जरांगे पाटील म्हणाले की, वडेट्टीवार हे बेजाबदार वक्तव्य करत आहेत. त्यांनी आता ओबीसी ऐवजी काँग्रेसचा मोर्चा काढावा. कारण ओबीसीच्या नावाखाली वडेट्टीवार आपली राजकीय दुकान चालवायला लागला आहे.


विदर्भ, खानदेशातले मराठे आमच्या संपर्कात आहेत. त्यांचे आम्हाला तसे फोन येत आहेत. त्यांचे आमचे नाते आहेत, आमच्यात रोटी-बेटी व्यवहार होत आहेत काही झालं तरी कुणबी आणि मराठा एक आहेत, आमचे रक्ता माणसाचे नाते आहेत. खानदेश, विदर्भातल्या मराठ्यांना वाईट वाटतं. याला ओबीसीच्या नावाखाली सटल होयचं आहे.


दिल्लीतला लाल्या सांगतोय त्याला मराठ्यांना टारगेट कर म्हणून. काही त्याचा तो ओबीसीच्या नावाखाली काँग्रेसचा मोर्चा आहे, विदर्भातले मराठे आणि कुणबी यावेळेस झटका दाखवणार आहेत त्याला. ओबीसी नेता नाही कोणी सगळे जातीचे आणि मोजक्या लाभार्थी टोळीचे नेते आहेत. गावगाड्यातल्या सर्व जाती मराठ्यांसोबत आहेत. भुजबळ सर्व माळ्यांचाच नेता होवू शकत नाही तर ओबीसीचा कसा होईल. आजपर्यंत बोगस आरक्षण खाणार्‍यांना खर्‍या आरक्षणावर बोलण्याची हिंमतच कशी होती. आम्ही तुमच्यासारखे दिसतोत म्हणून बंजारा समाजाचं आरक्षण खातायत.


दरम्यान, वडेट्टीवार यांच्या जीआर रद्द करण्याच्या प्रश्नावर पाटील म्हणाले की, ओरीजनल कुणबी नोंदी आहेत कायद्याने शोधलेल्या आहेत. एकही प्रमाणपत्र रद्द होणार नाही. मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढण्याच्या प्रश्नावर, परळीची लाभार्थी टोळी आणि येवल्याचा आलीबाबा यांना काय करायचंय विघ्नसंतोषी बोलायचं, आणि राज्यात दंगली घडवून आणायच्या अशी परळी आणि येवल्यात चर्चा सुरू आहे. येवल्यावाला (भुजबळ) फडणवीसलाच खड्ड्यात घालायाचं षडयंत्र शिजवतोय.


हे कसले ओबीसी नेते त्यांच्यात नुसती श्रेयवादाची लढाई सुरू आहे नेतेगिरीसाठी काही बरळतेत हे. आता त्यांना काही धनगर बांधवांच नेतृत्व खपत नाही. परळीच्या आणि येवल्यावाल्यांना. पण आपल्या आरक्षणाला धक्का लागलाना मग सांगतो त्यांना असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.


परळीवाल्या त्या दोघांनी छगन भुजबळच्या नादी लागू नये त्यांच वेगळ अस्तीत्व आहे. मराठ्यांचा विरोध त्यांना परडवणारं नाही. खूप संघार्षाने मिळवलेलं परळीच राजकीय अस्तीत्व घालू नये,त्याच्या नादीलागून चार टाळ्या मिळतील आज, पण एक दिवस असा येईल नंतर तुमच्यासाठी टाळी वाजवायला माणुस शिल्लक राहणार नाही.


जात प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढण्याच्या मागणीवर पाटील म्हणाले की, श्वेतपत्रिका निघत नाही आणि आमचं काही होत नाही. आता आम्हला आमच्या विरोधात बोलणार्‍याचे राजकिय अस्तित्व संपवावंच लागेल. मराठ्यांनो मया करून चालणार नाही. स्वभीमानी बना पाय चाटून चालणार नाही.विविध पक्षातील मराठ्यांनाही माझं अवाहन आहे त्याचं मतदान आहेच कितीक, त्यांच मतदानच नको असं समजून कामाला लागा.


मराठ्यांनी बारीक लक्ष ठेवायचं, आता कचाकच शेतात काम करायचं, रोज कष्ट करायचे, मिळेल तो व्यवसाय करायचा आजीबात झुकायचं नाही. दया, मया सोडा अन्यथा पुढच्या पिढ्या जातील.मराठ्यांच्या विरोधात जाणारा नेता लक्षात ठेवायचा आता. सर्कल, गणातून कोण आपल्या विरोधात जात होतं हे लक्षात ठेवायचं आता. ही जातीवाद करणारी घाण संपली की, सलोखा राहणार आहे हे लक्षात ठेवा.


मराठ्यांनी आता कडवट वागायचं परिणामाची चिंता करायची नाही, ओबीसी च्या नेत्यावर बोलण्यापेक्षा आमचे का खाली मान घालून जगताहेत तेच काही कळत नाही. मराठ्यांची आतूनही ऍक्शन पॉवर कमिटी तयार झाली आहे. पण काही मराठा नेत्यांना अव्हान आहे. किती दिवस खाली मान घालून जगता आता बोला जातीच्या बाजूने गरीब मराठे आणि राजकीय मराठे यांना एक व्हावं लागेल सुख हे मराठ्यांच्या नेत्यांना कुठच नाही. आता आम्हाला डाव टाकून मराठ्यांच्या विरोधात काम करणार्‍या नेत्यांचा गेम करावं लागणार आहे. आता गेम टाकायला सुरूवात करा. संयमाने आहोत गैर आर्थ घेवू नका आसा इशाराही त्यांनी दिला.

वडेट्टीवार यांच्या जरांगे पाटील यांनी आमचं वाटोळं केलं या वक्तव्याचा सामाचार घेत पाटील म्हणाले की, आमचाही सत्यानाश केला त्यांनी, 16 टक्के आरक्षण आमचं आहे. तुमच्या 14 टक्क्यांना धक्का लागता कामा नये ही आमची अपेक्षा आहे. ओबीसीच्या 14 टक्क्यांना धक्का लागता कामा नये पण वरचं 16 टक्के आरक्षण तुम्ही का घेतलं, ते आमचं आहे. आमचं आम्हाला परत करा. 50 टक्क्यांच्या वर 2 टक्के आरक्षण गेलं कसं. इंद्रासहानी, सुप्रीम कोर्टाने सांगितलं तरी कसं गेलं


50 टक्के च्या वर 2 टक्के गेलं ते रद्द करा , 1994 च्या जीआर नुसार आमचं 16 टक्के गेलं बोगस उपवर्ग बनवले आणि आमचं 16 टक्के घेतलं. ते आमचं आहे ते आम्हाला पाहिजे.


शिवाय 1994 पासून 2023 पर्यंत ओबीसी मध्ये घातलेल्या जाती सर्व बाहेर काढा त्यात 70 जाती अशा आहेत ते कोणतेच निकश पूर्ण करू शकत नाहीत. मागासवर्गात बसू शकत नाहीत. त्यामुळे त्या जाती बाहेर काढा.अशीमागणीही यावेळी जरांगे पाटील यांनी केली.


मराठा आणि ओबीसीच्या मुद्यावर मुख्यमंंत्री कोंडीत सापडलेत का? असा प्रश्न विचारला असता पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री कोंडीत सापडलेले नाहीत, आत्ताकुठं मुख्यमंत्र्यांनी योग्य ट्रॅक पकडला. प्रत्येक वेळेस छगन भुजबळ भाजपमधले नेते तयार करतो, आणि भाजपच्याच आंगावर घालतो. आरक्षणाला विरोध करणारे भाजपचेच भुजबळाला मंत्रीपद कोणी दिलं भाजपनेच मग हे फडणवीस साहेबांना कळत नाही का? सगळं कळतंय मुख्यमंत्री

फडणवीसांनी योग्य निर्णय घेतलाय कि मराठे सोडून चालणार नाही.


ओबीसीचे नेते गोळा करून भुजबळ ब्लॅकमेल करतोय हे त्यांच्या लक्षात आलं आहे. त्यांच्या डोक्यात आलंय कोणाची राख करायची, ते करणारचं ज्यांना मोठं केलं तेच उतायला लागले हे त्यांच्या लक्षात आलंय. सतारा पक्षातले सर्व फडणवीसाच्यां विरोधात एकत्र येत असल्याचा घणाघातही त्यांनी केला.


हैदराबाद गॅझेटिअर, सातारा, कोल्हापूर, औंध, बाँम्बे गव्हरमेंटचं गॅझेटिअर मराठ्यांच्या सरकारी दस्ताऐवज आहे.

मराठ्यांचं मन दुखवलंजाईल असं फडणवीस काही करणार नाहीत. कसलाही दगाफटका होणार नाही आपण सर्व आरक्षणात जाऊ, प्रमाणपत्र मिळाणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.


मराठा धनगर यांच्यात कसलीही दूही नाही एकमेकाविषयी चांगले संबंध आहेत. बंजारा समाज शहाना झाला, या युगात कोणी कोणाचं नाही ज्याला आपन दिलं त्यांनी आपलं वाटोळं केल्याचं बंजारा समाजाच्या लक्षात आलं आहे. तसंच आता ओबीसीतल्या लोकांनी हुशार होणं गरजेचं आहे. राज्यात मराठ्यांनी सर्वांना सांभाळलं. ओबीसींनीही मराठ्यांना सांभाळलं. एखादी जात नाशकी निघाली त्याला कोण काय करणार काढून फेका. लाभार्थी टोळीपासून सर्वांना लांब जावं लागणार आहे कारण ते दुसर्‍याला सुदरू देत नाहीत.


58 लाख कुणबी नोंदी संदर्भात प्रश्नावर जरांगे पाटीलयांनी कॅमेर्‍यासमोर कागदपत्रंच दाखवत या 58 लाख नोंदीचा पुरवा आणखी दोन दिवसांत माहिती येईल असंही पाटील म्हणाले.


दरम्यान, श्री क्षेत्र नारायण गडावरील दसरा मेळाव्यात शेतकर्‍यांच्या आंदोलना विषयी केलेल्या घोषणेबाबत पाटील म्हणाले की, शेतकर्‍यांवर अन्याया विरोधात मोठं आंदोलन उभाराहणार आहे. या राज्यातला घराघरातला शेतकरी उभाराहणार सरकारला पिकविमा, कर्ज माफी, हमी भाव यासह सर्व मागण्या मान्य कराव्या लागणार आहेत. आमच्या मुळावर उठलात तर आम्ही नेत्याला, सरकारला मोजीत नाहीत.


केंद्रीय गृहमंत्र्यांकडे शेतकर्‍यांच्या मागण्या आहेत. केंद्राच्या अधिकारात येणार्‍या मागण्यांची राज्य सरकारने शिफारशी कराव्यात. मला शेतकर्‍यांच्या चेहर्‍यांवर आनंद आणायचा आहे. असा आंनंद आणणार की सरकारपेक्षा शेतकरीच मोठा असला पाहिजे.असा आनंद आणणार आहे. लवकरच करोडे शेतकरी आंदोलनात उतराणार आहेत, शेतकर्‍यांनाही महित आहे मी बोलतो ते करणार असा इशाराही जरांगे पाटील यांनी यावेळी दिला.

Recent Posts

See All
स्वबळाचा नारा काँग्रेसचा ! फायदा मात्र भाजपाचा !!

मुंबई महापालिका निवडणूका काँग्रेस स्वबळावर लढणार! असा नारा भाई जगताप यांनी दिला आणि मुंबईचे राजकारण पुन्हा एकदा तापू लागले. मतदार यादीत घोळ झाला असा आरोप करीत भाजपा विरोधकांनी एकजुटीने आक्रमक भूमिका

 
 
 

Comments


bottom of page