जिंकलो रे राजा हो, तुमच्या बळावर; जीआर निघाल्यास मुंबई सोडणार! - मनोज जरांगे पाटील
- Navnath Yewale
- 13 hours ago
- 3 min read

मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. काही मागण्यांबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास सरकारने दिल्याचे म्हटले आहे. मराठा आंदोलकांचा विजय झाल्याचे म्हटले जात आहे. मराठा आंदोलकांचा विजय झाल्याचे म्हटले जात आहे. जीआर निघाल्यास मुंबई सोडणार असे जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर स्पष्ट केले आहे.
राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला पोहोचले. त्यांच्यासोबत शिवेंद्रराजे भोसले, माणिकराव कोकाटे आणि उपसमितीचे इतर सदस्य देखील पोहोचले. मनोज जरांगे पाटील यांना आरक्षणाचा मसुदा दिला सरकारची बाजू मांडण्यासाठी शिष्टमंडळ आझाद मौदानावर पोहोचले. भेटीदरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारची बाजू मांडली. यादरम्यान हायकोर्टात सुनावणी स्थगित करण्यात आली. कोर्टाने सुनावणी ÷उद्यापर्यंत तहकुब केली. उद्या 1:00 वाजता सुनावणीला पुन्हा सुरूवात होईल.
उपसमितीकडून आरक्षणाचा मसुदा तयार करून आरक्षणाच्या मुद्यावर जरांगेशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर मसुदा कायद्याच्या चौकटीत असल्याचा दावा आला. सरकारच्या शिष्टमंडळातील नेते, अधिकार्यांसह मनोज जरांगे पाटील यांनी चर्चा केली. मराठा आंदोलकांनी केलेल्या मागण्या आणि त्यावर सरकारने काय म्हटले हे मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या
पहिली मागणी: हैदराबाद गॅझेटची आंमलबजावणी करण्यात यावी, हैदराबाद गॅझेट अंमलबजाणीसाठी प्रस्थावित शासन निर्णयास उपसमिती मान्यता देत आहे या शासन निर्णयानुसार मराठा जातीतील व्यक्तींना गावातील, कुळातील, नातेवाईकांतील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाल्यास त्या आधारस्थानी चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही प्रस्थावित आहे. म्हणजे हैदराबाद गॅझेटला आंमलबजाणी दिलेली आहे. आंदोलकांची परवानगी असेल, तर त्यावर लगेच जीआर निघेल.
दुसरी मागणी: सातारा गॅझेट, पुणे, औंघ गॅझेटीयर नियमाच्या गॅझेटियरची अंमलबजावणी करण्यात यावी, सातारा संस्थान गॅझेटियर पुणे, औंध गॅझेटियर अंमलबजावणी करण्यातबाबत कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेण्यात येईल. त्याचं कारण असं की, दोन चे तीन विषयात कायदेशीर त्रुटी आहेत, जलदगतीने म्हणजेच पंधरा दिवसात अंमलबजावणी होईल असं म्हटलंय आहे. पंधरा दिवस एक महिन्यात अंमलबजावणी करून देतो असा शब्द राजेंनी दिला आहे, असे मनोज जरांगे
पाटील म्हणाले.
तिसरी मागणी- महाराष्ट्रातील सर्व मराठा आंदोलकांवर झालेल्या केसेस मागे घ्या, उपसमितीने आम्हाला सांगितलं की, त्यांनी गुन्हे मागे घेतले आहेत, जे उरले आहेत, ते कोर्टात जाऊन मागे घेऊ. सप्टेंबर अखेर पर्यंत, एका महिन्यात सर्व गुन्हे मागे करू असा जीआर काढलाय, मंत्र्यांच्या सह्या घेतल्या आहेत, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
चौथी मागणी: मराठा आंदोनामध्ये बलिदान देण्यार्यांच्या वारसांना नुकसानभरपाई देण्यात यावी, मराठा आंदोलनात बलिदान झालेल्यांच्या वारसांना 15 कोटींची मदत देण्यात आली आहे. उर्वरित कुटुंबाला एका आठवड्याच्या आत खात्यावर मदत जमा होईल. एसटी महामंडळात नोकरी मिळेल, असे सांगण्यात आले आहे. मनोज जरांगे पाईल यांनी नोकरीवर आक्षेप घेतला. एसटीमध्ये नोकरी देण्या ऐवजी दुसरीकडे चांगली नोकरी द्यावी, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. महावितरण, एमआयडीसीमध्ये सरकारी अधिकारी केलं तरी चालेल, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
पाचवी मागणी: 58 लाखा नोंदीचा रेकॉर्ड ग्रामपंचायतमध्ये लावा, 58 लाख नोंदीचा रेकॉर्ड ग्रामपंचायतमध्ये लावा या मागणीला परवानगी मिळाली आहे. आतापर्यंतच्या व्हॅलिडिटी रोखून धरल्या आहेत. त्या ताबडतोब मिळाव्यात असा आदेश काढावा. विखे पाटील - या संदर्भात स्वतंत्र माहिती घेऊन प्रत्येक सोमवारी सर्वदाखले मार्गी काढावा असा आदेश काढला जाईल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
सहावी मागणी: शिंदे समितीला तालुकास्तरावर कार्यालय द्या, तालुकास्तरावर वंशावळ समिती देण्यात आली आहे. पुढील जून 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. शिंदे समितीकडून नोंदी शोधण्याचे काम सुरू आहे. शिंदे समितीला तालुकास्तरावर कार्यालय द्या या मागण्या पूर्ण झाल्या आहेत.
सातवी मागणी: मराठा-कुणबी एक असा जीआर काढा, मराठा आणि कुणबी एक असल्याचा जीाआर काढा यावर सरकारने वेळ मागितला आहे. माठा आणि कुणबी एक असल्याचा जीाआर काढण्यासाठी मनोज जरांगे पाईल यांच्याकडून 45 दिवसांचा वेळ दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याकडे विखे पाटील यांनी दोन महिन्याचा वेळ मागितला. त्यावर जरांगे पाटलांनी दोन महिन्याचा वेळ दिला आहे.
आठवी मागणी: सगेसोयरे अध्यादेश निर्णय घ्या, सगेसोयरेच्या 8 लाख हरकती आल्या आहेत. त्याच्या तपासणीसाठी वेळ लागले. सगेसोयर्यांच्या अर्जाची छाननी करण्यात येत आहे. त्यासाठी वेळ लागेल. सर्व माण्यांचा जीाअर काढला जाणार आहे. जीआर काढल्याशिवाय मी इथून जाणार नाही. तुम्ही आजच याबाबतचा जीआर काढा, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
नववी मागणी: सहा हजरांचा दंड मागे घ्यावा, आरटीओने आम्हाला सहा-सहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मराठा आंदोलकांना मुंबईतील रस्ते माहिती नव्हते, त्यामुळे चुका झाल्या सरकारकडून आंदोलकांच्या गाडीवरील सर्व दंड मागे घेण्यात आले.
Comments