झाप पेसा ग्रामपंचायत सभेत लोकहिताचे ठराव
- Navnath Yewale
- Aug 23, 2025
- 1 min read

जव्हार: तालुक्यातील झाप लोकनियुक्त सरपंच एकनाथ दरोडा यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थितीत झाप ग्रामपंचायतीच्या सभेत1) नाशिक येथे सुरू असलेल्या रोजंदारी शिक्षकांना पाठिंबा देणे, 2)शिक्षकांना बाहेर स्रोत द्वारे आदेश न देता रोजंदारीवर द्या, 3)विनवळ या ठिकाणी पासून जव्हार आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत होत असलेल्या सेंटर किचन शेड वरून दिले जाणारे मध्यान भोजन बंद करून पूर्वीप्रमाणे शाळेवरून देण्यात यावे,4) झाप ग्रामपंचायत हद्दीतील गावांमध्ये जुगार मटका दमन बनवण्याची दारू हातभट्टीची,दारू,पेट्रोल,,डिझेल, गुटका, यावर बंदी घालण्यात आली आहे. 5)स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावात प्लास्टिक बंदी व कचरा मुक्त गाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, 6)जल जीवन मिशन अंतर्गत योजना डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण झाली नाही तर पंचायत समिती कार्यालय समोर आंदोलन करण्यात येईल असे सात ठराव ग्रामपंचायत सभेत लोकहिताचे ऐतिहासिक घेण्यात आले.
ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरण मध्ये पार पडले सात ऐतिहासिक ठराव घेण्यात आले. या ठरावांमुळे गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.
उपसरपंच सखाराम वड, सदस्य महेंद्र गवारी, लता राथड, कल्पना वातास, विलास बागुल, युवराज वाघ, ग्राम विकास अधिकारी अमोल भोये, रोजगार सेवक कृष्णा बेंडकोळी, कल्पना वड ग्रामपंचायत हद्दीतील सर्व अंगणवाडी सेविका आशाताई जिल्हा परिषद शिक्षक आरोग्य कर्मचारी व मोठे संख्येने नागरिक उपस्थित होते.
आज झालेल्या झाप पेसा ग्रामसभेमध्ये सर्वानुमते सहा ऐतिहासिक लोकहिताचे ठराव घेण्यात आले . या ठरावासाठी नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला तसेच घरपट्टी थकीतदारांना ग्रामपंचायत मार्फत आव्हान करण्यात आले की आपली घरपट्टी लवकरात लवकर भरून ग्रामपंचायतला सहकार्य करावे.
झाप ग्राम.सरपंच एकनाथ दरोडा



Comments